आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात आकाराला येतोय पुढचा खली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - एकोणचाळिसाव्या वर्षी पोलिस भरती? अशक्य वाटत असेल तर हरियाणात या. अंबालाच्या राजेश कुमारच्या पोलिस भरतीसाठी राज्य सरकारने सर्व नियम कायदे बदलून टाकले आहेत. यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात आली.
दनौरा गावातील रहिवासी असलेल्या राजेशला उंचीमुळे वेगळेपण मिळाले. त्याची उंची साडेसात फूट आहे. आता तो जागतिक स्तरावरील पैलवान, ग्रेट खलीच्या धर्तीवर तयार होण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. त्याच्याच रेसलिंग इन्स्टिट्यूटमधून डावपेच शिकत आहे. नव नाव-महाबली भीमसोबत त्याचा प्रवास सुरू झाला आहे. हिमाचलचा रहिवासी दिलीप राणा ऊर्फ ग्रेट खलीसाठी पंजाब सरकारने नियम बदलले होते. खलीने वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंटमध्ये अंडरवेटरल हरवून धूम उडवली होती.
सरकारची कृपा : पोलिस भरतासाठी 18 ते 25 वर्षे वय आणि बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर दहावी उत्तीर्ण 39 वर्षीय भीम पाचव्या बटालियनचा पोलिस झाला आहे. त्याला पोलिसाचे सामान्य प्रशिक्षण देण्याऐवजी प्रशिक्षक त्याचा रेसलिंग फिटनेस वाढवत आहेत. खलीने जालिंदरमधील ज्या रेसलिंग इन्स्टिट्यूटमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईची तयारी केली तिथेच भीमही धडे गिरवत आहे. 152 किलो वजनाच्या भीमला पोलिस शिपाई म्हणून मिळणा-या पगारातून त्याचा केवळ आठ दिवसांचा खाण्याचा खर्च भागू शकतो. राज्यातील पोलिस कर्मचा-याचे सुरुवातीचे वेतन भत्त्यांसह 20 हजार रुपये आहे.