आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gajendra Singh Said Before Death, Switch On Your TV

\'टीव्ही ऑन कर, मी दिसेन\', आत्महत्येपूर्वी गजेंद्र सिंहने केला होता भावाला फोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो: शेतकरी गजेंद्र सिंह)

जयपूर- दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर 'आप'च्या रॅलीदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या करणार्‍या गजेंद्र सिंह कल्याणवतने आपल्या भावाला फोन केल्याची माहिती समोर आली आहे. गळफास घेण्‍यापूर्वी आपल्याला गजेंद्र सिंहचा फोन आला होता. 'टीव्ही ऑन कर. त्यात मी‍ दिसेन', असे तो म्हणाल्याचे गजेंद्र सिंहचा भाऊ श्याम सिंह याने 'दैनिक भास्कर डॉट कॉम'शी बोलताना सांगितले.
श्याम सिंहने सांगितले की, बुधवार दुपारी दीड वाजेच्या सुमारास गजेंद्र सिंहचा फोन आला होता. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या रॅलीत असल्याचे त्याने आपल्याला सांगितले. 'टीव्ही चालू कर. कोणत्याही चॅनलजा त्यावर मी दिसेन', असे तो म्हणाला. टीव्ही चालू करून बघतो तर काय त्यावर गजेंद्र सिंहने गळफास घेत्याचे सांगितले जात होते. यावेळी श्यामसिंह भावूक झाला होता.

गजेंद्रच्या कुटुंबीयांनी 'आप'वर केले आरोप...
गजेंद्र सिंह 'आप'च्या रॅलीत सहभागी झाला होता. परंतु अन्य लोकांनी त्याला झाडावर का चढू दिले? 'आप' कार्यकर्त्यांनी त्याची मदत का केली नाही? गजेंद्रसिंह आत्महत्येची धमकी देत होता तर त्याच्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले? पोलिस आणि फायर ब्रिगेडचे जवान यावेळी कुठे होते? असे अनेक सवाल गजेंद्रचे आजोबा गिरधारी सिंह यांनी उपस्थित केले आहेत.
माझा शालक गजेंद्र दुबळा नव्हता. तो आत्महत्या करूच शकत नाही. अकाली पावसामुळे त्याचे मोठे नुकसान झाले होते. गेल्या काही द‍िवसांपासून तो त्रस्त होता. 'आप'च्या रॅलीत त्याला कोणी तरी चिथवले असावे, असे गजेंद्रसिंहचे मेव्हणे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
गजेंद्रचे काका राजेंद्र सिंह म्हणाले, की त्याच्या शेत मालाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तो त्रस्त होता. सरकारतर्फे त्याला तुटपुंजी मदत मिळाली होती. त्यामुळेत त्याने हे पाऊल उचलले असावे.
दरम्यान, सुसाइड नोटमधील अक्षर गजेंद्र सिंहचे नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइड्स वाचा , कोण होता गजेंद्र सिंह? आणि पाहा त्याचे निवडक फोटो...