आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत गजेंद्रच्या कुटुंबाला \'आप\'तर्फे 10 लाखांची मदत, भाजपने दिले चार लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मृत गजेंद्र सिंहचे वडील)
जयपूर- 'आप' नेता संजय सिंह यांनी आज (शुक्रवारी) मृत शेतकरी गजेंद्र सिंहच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 'आप'तर्फे गजेंद्रच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली. संजय सिंह यांनी दौसा जिल्ह्यातील झामलवाडा गावात जाऊन गजेंद्रच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांचा धनादेश दिला. यावेळी झामलवाडा गावात मोठा फौजाफाटा तैनात करण्‍यात आला होता. दुसरीकडे, गजेंद्र सिंग यांच्या कुटुंबासाठी भाजपने चार लाख रुपयांची मदत जाहीर करण्‍यात आली आहे.

संजय सिंह यांना पाहातच गावातील नागरिक संतापले होते, परंतु, घरी आलेल्या पाहुण्यांना अपमनित करायचे नाही, असे गजेंद्रच्या वडिलांने गावकर्‍यांना आधीच बजावले होते. म्हणून ते सगळे आज शांत दिसले. दरम्यान, दिल्लीत आम आदमी पक्षाच्या (आप) रॅलीदरम्यान शेतकरी गजेंद्र सिंह कल्याणवत याने गळफास घेवून आत्महत्या केली होती.
संजय सिंह यांनी बाहेरच गजेंद्र यांच्या मुलीची भेट घेतली. गजेंद्रच्या मुलीने संजय सिंह यांना नमस्कार केला. नंतर संजय सिंह यांनी गजेंद्रचे दोन्ही मुलांची विचारपूस केली. संजय सिंह यांनी गजेंद्र यांच्या घरात त्याच्या वडीलांना भेट घेतली. 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर घणाघाती आरोप करणारे गजेंद्रचे वडील आज तसे शांतच दिसले. 'केजरीवाल यांनी माफी मागितल्याने आमचे काहीही होणार नाही. आता आमचे कसे होईल, याबाबत सगळ्यांनी विचार करायला हवा. मला माझा मुलगा परत करा', असे गजेंद्रच्या वडीलांनी संजय सिंह यांना सुनावले.
दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि संसदीय कामकाजमंत्री राजेंद्र राठोड यांची शुक्रवारी दुपारी गजेंद्रच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी स्थानिक आमदार अलका सिंह उपस्थित होत्या. मृत गजेंद्र यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासह आत्महत्येची निष्पक्ष चौकशी करण्‍याचे आवाहन राजेंद्र राठोड यांनी दिले. तसेच गजेंद्रच्या कुटुंबीयांनी ठेवलेल्या सर्व अटी लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील, असेही राठोड म्हणाले.

कुटुंबीयांनी ठेवल्या चार अटी....
मृत शेतकरी गजेंद्र सिंहच्या कुटुंबीयांनी सरकारसमोर चार अटी ठेवल्या आहेत. गजेंद्रची एक मुलगी आणि दोन मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च सरकारने उचलावा, असे म्हटले आहे.

1. बारावीत शिकत असलेली गजेंद्रची मुलगी मेघाला जयपूरमधील महाराणी महाविद्यालयात प्रवेश मिळावा. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकारने उचलवावा.
2. सहावीत शिकणारा गजेंद्रचा लहान मुलगा धीरेंद्रला योग्यतेनुसार सरकारी नोकरी द्यावी.
3. गजेंद्रच्या मृत्यूची निष्पक्ष कोणत्याही प्रकारचा विलंब न करता चौकशी करण्‍यात यावी.
4. गजेंद्रचे पार्थिव स्थानिक पोलिस ठाण्यात आणल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षकाकडून झालेल्या कथित दुर्व्यवहाराची चौकशी करण्यात यावी.


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संबंधित फोटो...