आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीर्ण गांधी शिबिरात अहिंसेचा नवा अध्याय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटण्याच्या ए.एन. सिन्हा सामाजिक अध्ययन व संशोधन संस्थेतील हा एक फ्लॅट. नाव आहे गांधी शिबिर. 66 वर्षांपूर्वी उसळलेले दंगे शांत करण्याचे प्रयत्न करण्यासाठी महात्मा गांधीजी जवळपास 64 दिवस येथेच राहिले होते. आता हा फ्लॅट ‘अहिंसा शांती संशोधन कें द्र’ या नावाने विकसित केला जात आहे. यासाठी बिहार राज्य सरकारने एक कोटी रुपयांचा निधी ए.एन.सिन्हा संस्थेला दिला आहे. या निमित्ताने ढासळत्या भवनाला नवे रूप मिळणार आहे. गौतम बुद्धांपासून महात्मा गांधीजींच्या दर्शनाला आधार मानून सध्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक तणाव आणि दडपणांवर संशोधन करणारे हे एकमेव केंद्र असेल. अहिंसा आणि शांती या विषयांवरील संशोधनाची सुरुवात या वर्षी जुलैपासून होईल. संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 15 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. शाखा निवडण्याची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आहे. संस्थेचे संचालक डीएम दिवाकर यांनी सांगितले की, संस्थेच्या उपक्रमामुळे महात्मा गांधींना नव्याने समजण्यासाठी मदत होईल.

महात्मा गांधीजी या ठिकाणी 5 मार्च 1947 पासून 30 मार्च 1947 पर्यंत आणि 14 एप्रिल 1947 पासून 24 मे 1947 पर्यंत राहिले होते. ते तत्कालीन शिक्षणमंत्री डॉक्टर सय्यद महमूद यांच्या आमंत्रणावरून त्यांच्या निवासस्थानी (सध्याची ए.एन. सिन्हा संस्था) आले होते. गांधीजींसोबत निर्मल कुमार बोस, मनु गांधी, सय्यद अहमद, देव प्रकाश नायर आणि सय्यद मुज्तबा हेदेखील होते. त्यानंतर सीमांत गांधी खान अब्दुल गफारसुद्धा पोहोचले होते. मनुबहन गांधी यांनी ‘बिहार की कौमी आग में’ या डायरीत येथील जागेचा उल्लेख केला आहे.