आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महात्मा गांधींना ओशो म्हणाले होते असे काही... की हसू लागल्या होत्या कस्तुरबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती आहे. महात्मा गांधी आणि ओशो यांची संपुर्ण आयुष्यात दोनदा भेट झाली होती. ही घटना पहिल्या भेटीच्या काळातील आहे. स्वतः रजनीश यांनी याचा उल्लेख केला होता. ओशो यांनी महात्मा गांधींना पहिल्यांदा रेल्वे स्टेशनवर पाहिले होते. त्यावेळी ते गांधीजींना म्हणाले, होते, की तुम्ही सर्वात गरीब व्यक्ती आहात. ओशोंचे हे बोलणे ऐकून कस्तुरबा गांधी यांना हसू आले होते. 
 
आजीने दिलेले तीन रुपये घेऊन स्टेशनवर पोहोचले होते ओशो, गांधीजींना भेटल्यानंतर काय झाले...  
- त्यावेळी ओशो केवळ दहा वर्षांचे होते. त्यांना ट्रेन बघायची होती. यासाठी त्यांनी स्टेशन गाठले, त्यावेळी त्यांच्या खिशात त्यांच्या आजीने दिलेले तीन रुपये होते. ट्रेन तब्बल 30 तास उशीराने धावत होती. स्टेशनवर खूप लोक जमले होते. पण ट्रेन उशीरा असल्याने काही लोक स्टेशनवरुन परतत होते. मात्र ओशो तेथेच बसून राहिले. स्टेशन मास्टरांनी त्यांना तू सकाळपासून ट्रेनची वाट बघतोय, असे म्हणून टोकलेदेखील. 
- ट्रेन खूप उशीराने पोहोचली आणि स्टेशन मास्टरांनी ओशोंची भेट गांधीजींसोबत घालून दिली. गांधीजींच्या हातात त्यावेळी दान पेटी होती. ओशो यांच्याकडे तीन रुपये होते. गांधीजी म्हणाले,- हे पैसे देशातील गोरगरीबांसाठी आहेत, ते दान पेटीत टाक. काही प्रश्नोत्तरांनंतर ओशो यांनी ते पैसे दान पेटीत टाकले.  

पैसे दान पेटीत टाकल्यानंतर काय घडले?
ओशो यांनी पेटीत पैसे टाकले आणि नंतर गांधीजींच्या हातून ती पेटी हिसकावून घेतली. ते गांधीजींना म्हणाले, माझ्या गावातील लोक खूप गरीब आहेत, ते पैसे मी त्यांना वाटून टाकतो. पण थोड्यावेळाने रजनीश यांनी ती पेटी गांधीजींना परत केली आणि म्हणाले, ही पेटी तुम्हीच ठेवा, कारण तुम्ही सर्वात जास्त गरीब आहात. दरिद्र नारायण असा त्यावेळी रजनीश यांनी गांधीजींना म्हटले होते.
 
ओशोंनी पेटी हिसकावून घेतल्यानंतर कस्तुरबा काय म्हणाल्या होत्या.. 
यावेळी कस्तुरबा गांधीजींसोबत हजर होत्या. त्या हसून गांधीजींना म्हणाल्या होत्या - आज तुमच्या बरोबरीचे कुणी भेटले. या मुलाने तुमची पेटीच घेऊन टाकली. हे बरेच झाले. कारण ही पेटी सांभाळता सांभाळता मी थकून गेली आहे.  
 
गांधीजींच्या निधनानंतर लपून रडले होते रजनीश...
ओशो महात्मा गांधींचे मोठे टीकाकार होते. असे म्हटले जाते, की ज्या दिवशी गांधीजींची हत्या झाली होती, त्या दिवशी ओशो लपून रडले होते. गांधीजी अतिशय प्रामाणिक व्यक्ती होते, असे ओशो म्हणाले होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, गांधीजींची दुर्मिळ छायाचित्रे...  
बातम्या आणखी आहेत...