आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीनगर एअर शोमध्ये अपघात, पॅराग्लायडर जवान जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर -  हवाई दलाच्या एअर शोदरम्यान सोमवारी येथे पॅराग्लायडर जवान जखमी झाला. व्हायब्रंट गुजरात जागतिक गुंतवणूक परिषद-२०१७ मध्ये हवाई दलाने एअर शो ठेवला होता. विमानांच्या हवाई कसरतीनंतर पॅराग्लायडर्स एअर शो झाला. एकापाठोपाठ एक अशा १३ जवानांनी उड्या मारल्या, पण एका जवानाचे संतुलन गेल्याने तो जखमी झाला. संरक्षण दलाचे प्रवक्ता अभिषेक महापात्रा म्हणाले की, या जवानाचा पाय मुरगळला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कार्यक्रमाला मुख्यमंत्री विजय रूपाणी तसेच एअर मार्शल आर. एच. धीर यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते.