आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याला एसबीआयच्या शाखेतून दिलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो गायब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याला एसबीआयच्या शाखेतून दिलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचे छायाचित्रच नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  
श्योपूर जिल्ह्यातील बरोदा येथील एसबीआय शाखेतून  पैसे काढण्यासाठी गेलेले बिच्छूगवाडीचे शेतकरी लक्ष्मण मीना यांना दोन- दोन हजार रुपयांच्या तीन नोटा दिल्या. या नोटांवर गांधींचा फोटोच गायब आहे. नोटांवरील फोटोंची जागा कोरी आहे. मीना यांनी सांगितले की, मंगळवारी मी सहा हजार रुपये काढले. बँकेने मला दोन- दोन हजारांच्या तीन नोटा दिल्या.  बाजारात आल्यावर या नोटांवर गांधींचा फोटोच नसल्याचे नंतर माझ्या लक्षात आले या प्रकारानंतर मीना बँकेत गेले. त्यांनी शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार केली, तेव्हा नोटा घेतानाच तुम्ही तपासून घ्यायला हव्या होत्या, असे व्यवस्थापक म्हणाले व नंतर नोटा बदलून दिल्या. नंतर नोटा बँकेत जमा करण्यास सांगितले. या नोटा खऱ्या असल्याची खात्री बँक व्यवस्थापकाने केली आहे. चुकीने छपाईत म. गांधींचा फोटो आला नाही, अशी सारवासारवही व्यवस्थापकाने केली. बुधवारी मीना यांना या तीन नोटांच्या बदल्यात दुसऱ्या नोटा देण्यात आल्या. प्रभारी शाखा व्यवस्थापकांनी यासंबंधी आपण मुख्य व्यवस्थापकांना कळवले असल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
 
 
बातम्या आणखी आहेत...