आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gandhi's Life Created Within Coins, Divya Marathi

महात्मा गांधींचा जीवनप्रवास कोलकात्यात पदकांकित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. त्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली असून गांधींच्या जीवनप्रवासाला विविध पदकांतून चिन्हांकित करण्यासाठी आलोक गोयल यांनी पुढाकार घेतला आहे. आलोक गोयल हे जुनी नाणी, चलन यांचे संग्राहक व विक्रेते आहेत. त्यांनी गांधींजींच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना पदकांकित केले आहे.

गांधी जयंतीनिमित्त ‘रूट टू इंडिया’ या मर्यादित पदकांद्वारे गांधींच्या १९१४ पासूनच्या प्रवासाला जगाच्या नकाशावर अंकित करण्यात आले आहे. यात गांधींच्या विविध छायाचित्रांचाही वापर करण्यात आला आहे. आफ्रिका-भारत प्रवासातील तारीख व त्यांनी प्रवास केलेल्या जहाजांचा तपशील यात देण्यात आला आहे. यात गांधींचे प्रसिद्ध अवतरण त्यांच्या सहीसह देण्यात आले असल्याचे गोयल यांनी सांगितले.

वंशवादाविरुद्ध यशस्वी लढा दिल्यावर गांधींनी १४ जुलै १९१४ रोजी आफ्रिका सोडले. त्यानंतरचा त्यांचा प्रवास ५०० पदकांमध्ये गोयल यांनी चिन्हांकित केलाय. कॉइन्स अँड कॉइन्स डॉट कॉम या संकेतस्थळावर गोयल यांनी याविषयी माहिती दिली आहे. ५०० मेडल्समध्ये महात्मा गांधींच्या ३३ वर्षांच्या प्रवासाला अंकित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.