आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयव्हरी कोस्टमध्ये गणेशाचे विशेष चलनी नाणे होणार उपलब्ध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - जर्मनीत तयार करण्यात आलेले श्रीगणेशाचे विशेष चलनी नाणे आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट सरकार लवकरच उपलब्ध करणार आहे. पिंपळाच्या पानावर गणेशाची रंगीत छबी व त्याखाली ‘वक्रतुंड महाकाय...’ हा श्लोक लिहिलेले नाणे नागरिकांना गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर उपलब्ध होणार आहे. 25 ग्रॅम वजनाची चांदीची 1001 गणेश नाणी तयार करण्यात आली आहेत. 8001 रुपयांमध्ये त्याची आगाऊ मागणी नोंदवली जात आहे. 9 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला नाणी दिली जातील.

आतापर्यंत कोणत्याही सरकारने गणेशाचे नाणे प्रसिद्ध केले नाही. त्यामुळे त्याकडे विशेष नाण्याच्या रूपात पाहिले जाते. या नाण्याचे मूल्य कितीतरी जास्त आहे. भारतामध्ये श्रींच्या नाण्याला मोठी मागणी आहे. मात्र, भारतीय टाकसाळीत सण-उत्सवानिमित्त ती तयार केली जात नाहीत. आपल्याकडे गणेशाचे नाणे उपलब्ध नाही. अशा पद्धतीचे हे पहिलेच विशेष चलनी नाणे आहे, अशी माहिती ए.जी. इम्पेक्सचे आलोक के. गोयल यांनी दिली. इम्पेक्सकडे नाण्याच्या जगभरातील मार्केटिंगचे हक्क आहेत. कंपनीकडे नाणे मागणीची नोंद सोमवारपासून सुरू झाली आहे.


नाण्यात आयव्हरी कोस्टचे प्रतीक
श्रींचे वाहन मूषकाच्या आकारातील पेटीत नाणी पाठवण्यात आली आहेत. आयव्हरी कोस्ट प्रतीकाच्या केंद्रबिंदूमध्ये हत्तीचे मस्तक आहे. एका बाजूला आयव्हरी कोस्टचे प्रतीक, तर दुस-या बाजूला गणेशाचे छायाचित्र असल्यामुळे नाणे आकर्षक झाले आहे. सार्क देशांतील विशेष नाण्यांच्या मार्केटिंगसाठी गोयल यांनी कॉइन इन्व्हेस्ट ट्रस्टशी भागीदारी केली आहे.
गणेशाव्यतिरिक्त महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आदी मान्यवरांची विशेष नाणी आयात करण्याची आमची योजना आहे, असे इम्पेक्स कंपनीच्या गोयल यांनी सांगितले. गोयल यांना लहानपणापासून नाण्यांचा संग्रह करण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे विविध 5000 नाणी आहेत.