आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Art On Toitet Sheet In Jawaharla Art Cente At Jaipur

\'टॉयलेट पॉट्‍स\'वर दाखवले गणरायाचे रुप, जवाहर कला केंद्रातील प्रदर्शन वादाच्या भोवर्‍यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: प्रदर्शनात ठेवण्यात आलेला टॉयलेट पॉट. त्यावर गणरायाचे रुप दाखवण्यात आले आहे.)
जयपूर- जवाहर कला केंद्रात आजपासून (शुक्रवारी) सुरु होणारे पाच दिवसीय अखिल भारतीय कला प्रदर्शन वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. प्रदर्शनात मांडण्यात येणार्‍या कलाकृतींमध्ये आराद्य दैवत गणपतीचे रुप असलेले 'टॉयलेट पॉट्‍स' असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

जयपूरचे मूर्तीकार चंद्रप्रकाश गुप्‍ता यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गुप्ता आपल्या सहकार्‍यासोबत जवाहर कला केंद्रात सुरु असलेल्या प्रदर्शनाविरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत. श्रीगणेश प्रथम पुजनीय आहे. टॉयलेट पॉटवर त्यांचे रुप दाखवणे हे फारच लज्जास्पद असल्याचे गुप्ता यांनी म्हटले आहे. जनसमस्‍या निवारण मंचाचे प्रमुख सुरज सोनी यांनी प्रदर्शन बंद करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.

उदयपूरचे ज्येष्ठ चित्रकार भूपेश कावडिया यांनी टॉयलेट पॉट्‍सवर गणरायाचे रुप साकारले आहे. कावडीया यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी टॉयलेट पॉट्सवर त्यांनी गणरायाचे रुप साकारले. नागरिकांच्या भावना दुखावण्याचा कुठलाही हेतू नव्हता.
टॉयलेट पॉट्सवर धार्मिक आस्थेचे प्रतिक मानले जाणारे नाड्याचे बंडल ठेवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर एक डब्ल्युसीला उलटे ठेवून त्यावर तीन कवड्यांचे त्रिनेत्र दाखवण्यात आले आहे. तसेच सोने वर्क लावून गणपतीच्या सोंडेचा आकार देण्यात आला आहे. 'सफाई भगवान तुल्य', 'टॉयलेट के बिना घर में वधू नहीं' असे खाली घोषवाक्यही लिहिले आहे.
या इन्स्टालेशनच्या माध्यमातून देशातील नागरिकांना शौचालयापती जागरुकता पसरवण्याच्या प्रयत्न केल्याचे चित्रकार भूपेश कावडिया यांनी सांगितले.

आध्यात्म नाही, कला
अखिल भारतीय कला प्रदर्शनाचे संयोजक आणि राजस्थान ललित कला अकॅडमीचे माजी अध्यक्ष डॉ. भवानी शंकर शर्मा यांच्या मते, लाल नाडा हा साधा दोरा आहे. टायलेट पॉटवर दाखवलेली चिन्हे ही कलात्मक आकृत्या आहेत. त्याचा अध्यात्माशी काही संबंध नाही. ‍मूर्तीकारातील ही कला असून त्याने ती सादर केली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, प्रदर्शनात ठेवण्याच आलेले टॉयलेट पॉट...