आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक संकल्प : वाचले हजारो नदी-तलाव, गणेशमूर्ती घरात विसर्जनाची मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/ औरंगाबाद/नाशिक/जयपूर/अहमदाबाद/रायपूर/पाटणा - यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आस्था आणि पर्यावरण संरक्षण मोहिमेत चांगला ताळमेळ दिसून आला. लाखो लोकांनी गणेश विसर्जन तर केले पण जलस्रोतांना प्रदूषित न करता. कारण यंदा मातीच्या गणेशमूर्तींचा आशीर्वाद पाठीशी होता. दैनिक भास्कर समूहाने मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना आणि त्यांचे घरातच विसर्जन करण्याची मोहीम राबवली. जेणेकरून नद्या, तलाव व इतर जलस्रोतांचे जतन होईल.
सरकारनेही पुढाकार घेऊन या दृष्टीने काम केले. या वेळी आपण उद्दिष्टाच्या बऱ्यापैकी जवळ पोहोचलो आहोत. आता पुढील वर्षी घरोघरी मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना व्हावी आणि घरांतच त्यांचे विसर्जन व्हावे, असा प्रयत्न असेल. या प्रक्रियेला पुढील वर्षी आणखी वेग येईल, अशी आशा लोकांनी व्यक्त केली आहे. आपले जलस्रोत प्रदूषित होऊ नये म्हणून बहुतेक कुटुंबे मातीच्या गणपतीची प्रतिष्ठापना करून घरातच त्याचे विसर्जन करतील. भास्कर समूहाच्या या मोहिमेत सहकार्यासाठी आम्ही सर्व लाखो वाचकांचे आभार मानतो. भविष्यातही तुम्ही-आम्ही मिळून पर्यावरणासाठी मोठा आदर्श निर्माण करूत. देशभरातून मिळालेल्या माहितीनुसार, नाशकात २ लाख ७१ हजार ३८६ गणेशमूर्ती घरातच कुंड्या वा भांड्यांत विसर्जित करण्यात आल्या. नाशिक नगरपालिकेच्या दाव्यानुसार, यंदा ८०% लोकांनी नदीत मूर्ती विसर्जन टाळले. ५८ ठिकाणी कृत्रिम तलाव बनवण्यात आले. ६५ संस्थांच्या ५० हजार स्वयंसेवकांनी मेहनत घेतली. औरंगाबादेत कोरड्या विहिरींत पाणी भरून त्यात गणेश विसर्जन झाले.
भोपाळमध्ये विसर्जनासाठी अनेक कॉलन्या व घाटांवर कृत्रिम कुंड उभारण्यात आले होते. इंदूरच्या यशवंत सागर, सिरपूरसह चार तलाव प्रदूषित होण्यापासून वाचले. नगरपालिकेने ५५ ठिकाणी शिबिरे आयोजित करून मूर्ती एकत्र केल्या. पालिकेने बनवलेल्या कुंडांत सुमारे ६५ टँकर पाणी भरून विसर्जन झाले. उदयपुरात ४००० गणेशमूर्तींचे तलावांत विसर्जन झाले नाही. प्रथमच अनंत चतुर्दशी व नंतरच्याही दिवशी तलाव स्वच्छ दिसले. अहमदाबादेत साबरमतीच्या किनाऱ्यावर विशेष कुंड बनवण्यात आले. सूरतमध्ये ११ कृत्रिम तलावांत १५,२७५ मूर्ती विसर्जित झाल्या. यामुळे १२ हजार किलो पीओपी जलाशयांत जाण्यापासून वाचले. राष्ट्रीय हरित लावादाचे निबंधक देवनारायण पाटील यांनी सांगितले की, भास्कर समूहाने ज्या पद्धतीने मोहीम राबवली त्यामुळे लोकांत जागरुकता निर्माण झाली.
लोकांनी मातीच्या मूर्तींची स्थापना करून घरातच विसर्जन केल्याची माहिती आमच्याकडे बऱ्याच ठिकाणांहून आली. यामुळे तलावांचे शहर असलेल्या भोपाळमधील ६ मोठे जलस्रोत प्रदूषित होण्यापासून वाचले. जयपूर, हिमाचल, पाटणा, रायपुरातही मोठ्या संख्येने लोकांनी मोहिमेत सहभाग घेऊन आपल्या जलस्रोतांना प्रदूषित होण्यापासून वाचवले.
राष्ट्रीय हरित लवादाचे निबंधक देवनारायण पाटील यांनी सांगितले की, भास्कर समूहाने ज्या पद्धतीने मोहीम राबवली त्यामुळे लोकांत जागरुकता निर्माण झाली. लोकांनी मातीच्या मूर्तींची स्थापना करून घरातच विसर्जन केल्याची माहिती आमच्याकडे बऱ्याच ठिकाणांहून आली. यामुळे तलावांचे शहर असलेल्या भोपाळमधील मोठे जलस्रोत प्रदूषित होण्यापासून वाचले. जयपूर, हिमाचल, पाटणा, रायपुरातही मोठ्या संख्येने लोकांनी मोहिमेत सहभाग घेऊन आपल्या जलस्रोतांना प्रदूषित होण्यापासून वाचवले.