आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामुहिक बलात्कार प्रकरणात, पाच पोलिस अधिकारी निलंबित; विद्यार्थिनीवर बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाेपाळ- विद्यार्थिनीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास विलंब लावल्याबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी शुक्रवारी दुपारी तीन ठाणेदार आणि दोन सहायक फौजदारांना निलंबत केले. मुख्यमंत्र्यांनी दुपारी १२ वाजता घाईघाईत बोलावलेल्या बैठकीत पोलिस महासंचालक ऋषीकुमार शुक्ला यांना फटकारले. 

गुन्हे रोखण्यासाठी तुमचे असेच प्रयत्न चालू असतात का? अशा शब्दांत त्यांना झापले. शुक्लांना उत्तर देता आले नाही. बैठकीस मुख्य सचिव बी. पी. सिंह, सहायक पोलिस महासंचालक गुप्तचर विभाग, पोलिस महानिरिक्षक भाेपाळ आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंगळवारी संध्याकाळी एका विद्यार्थिनीवर चार गुंडांनी हबीबगंज रेल्वे स्थानकाजवळ सामुहिक बलात्कार केला होता. दुसऱ्या दिवशी ती पालकासमवेत गुन्हा नोंदवण्यास गेली असताना पोलिसांनी टाळाटाळ केली होती.

निरापराध्यास उचलून आणले, दोन दिवस लॉकअपमध्ये ठेवले
रेल्वे पोलिसांनी एका निर्दाेष व्यक्तीस पकडून आणले. त्याला दोन दिवस कोठडीत ठेवून मारहाण केली. पोलिसांनी चौथा आरोपी रमेश उर्फ राजू याच्याऐवजी राजेश राजपूत याला अटक केली. विद्यार्थिनीने राजेशला आरोपी म्हणून ओळखण्यास नकार दिल्यानंतर हे बिंग फुटले.
बातम्या आणखी आहेत...