आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणा: मेडिकल कॉलेजच्‍या 4 गार्ड्सने केला रुग्‍ण महिलेवर सामुहिक बलात्‍कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव- नूंह जिल्‍ह्यात असलेल्‍या राजा शहीद हसन खान मेडिकल कॉलेज, नलहरमध्‍ये एक धक्‍कादायक प्रकरण समोर आले. येथे सोमवारी मध्‍यरात्रीच्‍या दरम्‍यान 4 सुरक्षा रक्षकांनी एका महिला रुग्‍नावर सामुहिक बलात्‍कार केला आहे. पोलिसांनी या चारही नराधमांविरोधात गुन्‍हे दाखल केले आहेत. पीडित महिलेची प्रकृती गंभीर असल्‍याचे सांगितले जात आहे. 6 दिवसांपासून होती हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल..
- बीमा गावातील महिला तिच्‍या आठ वर्षीय मुलासोबत हॉस्‍पिटलमध्‍ये होती.
- महिलेच्‍या मुलाला गळा दुखीचा त्रास होता. त्‍याच्‍यावर जयपूरमध्‍ये उपचार झाले.
- मुलगा ठीक आहे. मात्र, त्‍याच्‍या आईला मानसिक धक्‍का बसला आहे.
- तिला 1 जूनला राजा शहीद हसन खान मेडिकल कॉलेज नलहरमध्‍ये दाखल केले.
- सोमवारी रात्री सुरक्षा रक्षकांनी सर्व नातेवाईकांना नेहमीप्रमाणे वार्डाच्‍या बाहेर काढले.
- महिलेचा मुलगा त्‍याच्‍या नातेवाईकासोबत बाहेर झोपला होता. तो रडत असल्‍याचे सांगून
सुरक्षा रक्षकांनी महिलेला बाहेर बोलावले..
- त्‍यानंतर वार्डच्‍या बाहेर असलेल्‍या एका खोलीत महिलेला नेण्‍यात आले.
- महिलेच्‍या तोंडावर कपडा बांधून तिच्‍यावर अत्‍याचार करण्‍यात आले.
- दोन गार्ड बाहेर पहारा देत होते.
- दरम्‍यान महिलेच्‍या नातेवाईकाला जाग आली. महिला बेडवर नसल्‍याचे पाहून तो गोंधळला.
- तो तिचा शोध घेत होता. तेवढ्यात त्‍याला समोरील खोलीतून महिलेचा आवाज ऐकू आला.
- तो तेथे पोहोचताच सुरक्षा रक्षकांनी महिलेला सोडून पळ काढला.
- महिलेच्‍या जेठाने वार्डन सोना यादवला याबाबत विचारणा केली. मात्र त्‍यांना कोणतिही माहिती देण्‍यात आली नाही.
- पहाटे पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्‍यात आली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, हे आहेत चार नराधम.................
बातम्या आणखी आहेत...