आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंडमध्ये महिला ग्रामपंचायत सदस्यावर सामुहीक बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकुड (झारखंड)- मालपहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नसीपूर ग्रामपंचायतमधील एका महिला सदस्यावर चार नराधमांनी सामुहीक बलात्कार केल्याची घटना गेल्या सोमवारी उघडकीस आली. पोलिसांनी चारही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला सोमवारी काही कामानिमित्त घराबाहेर पडली होती. परंतु बराच कालावधी उलटल्यानंतर ती घरी न परतल्याने तिच्या पतीने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला. नसीपूर गावातील रहिवासी धोना पहाडिया याच्या घरात पीडित गंभीर अवस्थेत आढळून आल्याचे पतीने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले, की जमाल शेख, पिंटू शेख, असगर शेख आणि अन्य एकाने तिच्यावर सामुहीक बलात्कार केला.

मालपहाडीचे उपपो‍लिस निरीक्षक अरविंद यादव यांनी सांगितले, की पीडितेला पाकुड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.