पाली- झालावाडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि जयपूरमध्ये आलेल्या मलेशियन महिला पर्यटकावर झालेली बलात्काराची घटना ताजी असताना आणखी एक गॅंगरेपचे प्रकरण उघडकीस आले आहे.
मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजस्थानातील पाली जिल्ह्यातील सोजत गावात एका तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. तरुणीचे अपहरण करून गॅंगरेप करणार्या नराधमांनी पीडितेची अश्लील क्लिपिंग तयार करून नराधम फरार झाले आहेत. एवढेच नव्हे तर पीडितेचे कोर्या बॉन्ड पेपरवर पीडितेची स्वाक्षरीही घेतली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी ही घटना घडली. तरुणीवर चार जणांनी बलात्कार करून तिच्या अश्लील क्लिपिंग इंटरनेटवर पोस्ट करण्याची धमकी दिली. समाजात आपली बदनामी होईल, या भीतीने पीडितेसह तिच्या वडीलांनी कोणाकडेही याबाबत वाच्याता केली नाही. मात्र, संपूर्ण गावात ही बातमी पसरल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी रविवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. एसपी जयनारायण शेर यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन पीडितेसह तिच्या कुटूंबियांची भेट घेऊन संपूर्ण चौकशी केली. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाल्याचेही शेर यांनी सांगितले.
चंडावल येथील राहणारा राजूराम ढगलाराम जटिया (20), रामलाल लादूराम नट (22), चेतन कुमार केवलराम जटिया (21) आणि एका तरुणाने पीडितेचे जंगलातून अपहरण केले. तरुणीला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवले. एका अज्ञात स्थळी तिला नेऊन चौघांनी तिच्यावर आळीपाळी बलात्कार केला. एवढेच नव्हे तर मोबाइलमध्ये तिचे अश्लील फोटो घेतले. फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर ते पोस्ट करण्याची धमकीही दिली. तसेच एका कोर्या बॉंड पेपरवर तिची स्वाक्षरी घेऊन सर्व जण तेथून फरार झाले.
घटना घडली त्या दिवशी पीडितेचे वडील बाहेरगावी गेले होते. ते घरी आल्यानंतर त्यांना आपबिती सांगितली. परंतु गावात बदनामी होईल, या भीतीने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नाही.
(फोटो कॅप्शन: चौकशी करताना पालीचे एसपी, डीएसपी आणि अन्य पोलिस अधिकारी)