आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gang Rape With Minor Girl In Train Near Samastipur Bihar

बिहारमध्ये धावत्या रेल्वेत मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेची प्रकृती चिंताजनक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- देशाची राजधानी दिल्लीत धावत्या बसमध्ये एका विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेच्या वेदना अजून ताज्या असताना बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर धावत्या रेल्वेत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगी तिच्या एका मित्रासोबत कोलकाता येथे जात असताना प्रवासादरम्यान तिच्या मित्रासह पाच जणांनी तिच्यावर धावत्या रेल्वेत बलात्कार करून तिला खाली फेकून दिले. समस्तीपूरजवळ पीडित मुलगी जखमी अवस्थेत रेल्वे पोलिसांना आढळून आली. तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पाटणा येथील 'पीएमसीएच'मध्ये हलवण्यात आले आहे.

14 वर्षीय पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, ती गोपालगंज येथील रहिवासी असून आपला मित्र रूपेश याच्यासोबत कोलकात्याला जात होती. रूपेशसोबत त्याचे अन्य चार मित्रही होते. प्रवासादरम्यान रूपेश याने तिला शयनकक्षातील शौचालयात नेले आणि त्याच्यासह त्याच्या चार मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर नराधमांनी तिला अर्धनग्नावस्थेत धावत्या गाडीतून खाली फेकून दिले.


सिव्हिल सर्जन डॉ.लखेन्द्र प्रसाद यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या शरीराची अनेक हाडे मोडली गेली आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे.