आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदी बनवून भावासमोरच अल्पवयीन बहिणींवर 15 जणांचा Gang Rape

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासाराम(बिहार) - येथे 15 मुलांनी भावाला बंदी बनवून त्याच्यासमोरच त्याच्या दोन बहिणींवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

सासाराम येथील चंदतन शहीद पहाड परिसरातील ही घटना आहे. पीडित मुली या मामेबहिणी आहेत. यापैकी एक मुलगी करगहर, तर दुसरी बक्सरची राहणारी आहे. दोघींचे वय सुमारे 16 च्या आसपास आहे. त्या आपल्या भावाबरोबर ताराचंडी येथून दर्शन घेऊन परतत होत्या. या मुलांनी चाकूचा धाक दाखवून भावाला ताब्यात घेऊन त्याला बंदी बनवले. त्यानंतर त्याच्यासमोर त्याच्या दोन्ही बहिणींवर गँगरेप केला. सुमारे दोन तास हा प्रकार सुरू होता. त्यानंतर कसातरी या मुलींचा भाऊ त्यांच्या तावडीतून सुटला आणि वसतीपर्यंत पोहोचला आणि स्थानिक लोकांना याबाबत माहिती दिली. पण तोपर्यंत आरोपी मुले फरार झाली होती. दोन्ही मुलींना बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एएसपी सुशांत सरोज यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपींची ओळख पटली असून ते सगळे स्थानिक आहे. पोलिस छापे टाकत असून लवकरच सर्वांना अटक केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...