आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंदूरमध्ये बनावट एलईडी बल्बचा कारखाना सील, केंद्राच्या नावाने सुरू होती विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - केंद्र सरकारच्या उजाला योजनेच्या आड बनावट बल्बची विक्री करणाऱ्या टोळीचा कारखाना पोलिसांनी सील केला. येथील तीन मजुरांना साक्षीदार करण्यात आले आहे. कारखाना मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. टोळीचा मास्टरमाइंड उज्जैनचा असल्याचे आरोपींनी सांगितले. तो मुंबईहून बनावट बल्बसाठी बॉक्स प्रिंट करून आणत होता.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक राकेशकुमार सिंह यांनी सांगितले की, योजना क्रमांक ५४ येथील कारखाना बंद करण्यात आला आहे. कारखाना मालक हरेंद्र पाठक, व्यवस्थापक विवेक पचौरी आणि हनी सायमन यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अनुप दुबे, विवेक यादव आणि तरुण वर्मा यांची भेट घेतली होती. तिघांकडून बनावट बल्बबाबत माहिती घेतली. याच आधारे पोलिसांनी त्यांना साक्षीदार केले आहे.

दोन वर्षांपासून कारखाना सुरू
२०१४ पासून हा कारखाना सुरू होता, असे आरोपींनी सांगितले. उज्जैनचा रहिवासी नौशादशी आपला संपर्क झाला होता, असे हरेंद्रने सांगितले. त्यानेच बनावट बल्ब शासकीय योजनेचे लेबल लावून विक्री करण्याची योजना आखली होती. नाैशादचे मुंबईतील व्यक्तीशी संबंध आहेत. तेथून त्याने बल्बसाठी बॉक्स बनवून आणले होते. त्यावरील प्रिंट खऱ्या बल्बच्या बॉक्सप्रमाणे होती. यामुळे शासकीय बल्बच्या बॉक्सचा घोटाळा तर झाला नाही ना, असा संशय येतो. पोलिस नौशादच्या शोधात आहेत.

खराब बल्बमुळे संशय वाढला
एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लि.(ईईएसएल) कंपनीचे सहायक व्यवस्थापक कुणाल सोनी यांनी बनावट बल्ब विकले जात असल्याची तक्रार दिली होती. ते म्हणाले, उजाला योजनेअंतर्गत बल्ब बनवणाऱ्या चार कंपन्या सूर्या, क्रॉम्प्टन, एव्हरेडी आणि एचक्यूद्वारे वीज कंपनीच्या क्षेत्रात ८५ रुपयांत एलईडी बल्ब विकले जात आहेत. या बल्बसोबत तीन वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी मिळते. ज्या विभागात बल्ब विकले जात होते तेथून खराब बल्ब बदलून दिले जात होते. याबाबत तपासणी केली तेव्हा संबंधित बल्ब कंपनीचे नव्हे, तर बनावट असल्याचे लक्षात आले. मात्र, त्यांचे लेबलचे बॉक्स खरे असल्याचे दिसले. संबंधित कंपन्यांनी चौकशी केली असता काही केंद्रांत एका टोळीच्या एजंटाने हा बल्ब ६५ रुपयांत देऊ केल्याचे समोर आले होते.
बातम्या आणखी आहेत...