आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ganga Clean Not Possible In 50 Years Murlimanohar Joshi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

..तर गंगा स्वच्छता ५० वर्षे होणे नाही, भाजप नेते जोशी यांचा घरचा आहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - नमामि गंगे प्रकल्प आहे त्या पद्धतीने सुरू राहिला तर ५० वर्षांत गंगेची स्वच्छता होणे नाही, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. पर्यावरण दिनाच्या आदल्या दिवशी तुलसी घाटावर स्वच्छ गंगा अभियान सोहळा ठेवण्यात आला होता. जोशी म्हणाले, प्रकल्पात अनेक त्रुटी आहेत. तुकड्यांनी गंगेची स्वच्छता शक्य नाही. गंगेत जलवाहतुकीच्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या योजनेवर त्यांनी टीका केली.