आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगेजवळ कचरा फेकण्यावर बंदी, देशात नदीचे असे आहेत हाल... पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - राष्ट्रीय हरित लवादाने (NGT)हरिद्वारपासून ते उन्नावपर्यंत गंगा नदीच्या किनाऱ्याला लागून 100 मीटरपर्यंत परिसराला नो डेव्हलपमेंट झोन घोषित केले आहे. या परिसराच्या किनाऱ्यापासून 500 मीटरपर्यंत एखाद्याने कचरा टाकल्यास त्याला पर्यावरणाच्या नुकसानासाठी 50 हजारांचा दंड द्यावा लागेल. उत्तराखंडच्या देवप्रयागमध्ये गंगा नदीचे पुजारी लोकेश शर्मा (19) सांगतात, 1 अब्ज हिंदूंद्वारे पूजली जाणारी ही नदी प्रदूषणामुळे आता मरणपंथाला लागली आहे.
 
देवप्रयाग येथून भाविक पाणी भरून नेतात...
- भारताची पवित्र गंगा नदी हिमालयात अगदी स्वच्छ, नितळ, सुंदर दिसते. परंतु जसजशी ती पुढे जाते, तसतशी औद्योगिक प्रदूषण आणि भक्तांद्वारे फेकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे विषारी नाल्यात तिचे रूपांतर होते.
- लोकेश सांगतात की, देवप्रयाग एक लहानसे डोंगरी भागातील शहर आहे. येथे गंगा दोन नद्यांच्या संगमातून बनते. ते त्यांच्या कुटुंबातील चौथ्या पिढीचे पुजारी आहेत.
- "मी कधीच इतर कुठे जाण्याचा, दुसरीकडे वसण्याचा विचार केला नव्हता. देवप्रयाग माझ्यासाठी स्वर्गासमान आहे. मला माता गंगेजवळ जन्म घेण्याचे भाग्य लाभले."
- येथे लोकं येतात आणि आपापल्या बाटल्यांमध्ये पाणी भरून नेतात. या पाण्याने घरातील देवीदेवतांच्या मूर्तीची पूजा करतात तसेच त्यांचा विश्वास आहे की, गंगेच्या पाण्याचा एक थेंबही त्यांना आयुष्यभरातील पापांपासून मुक्ती देईल.
 
जसजशी नदी पुढे जाते, तसतशी मलिन होत जाते
- गंगा नदी जसजशी पुढे पुढे जाते तसतशी तिच्यात प्रदूषण आणि कचऱ्यामुळे अधिकच घाण दिसून येऊ लागते. या पाण्यातच काशीत सध्या अंघोळी उरकल्या जात आहेत. ही खूप गंभीर बाब आहे. 
- एक भाविक म्हणाला, गंगा आमची आई आहे. ती जर प्रदूषित झाली असेल तर आम्हालाही कुठलेच भविष्य राहणार नाही.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, गंगा नदीचे आणखी काही विचार करायला लावणारे फोटो
बातम्या आणखी आहेत...