आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशातील चंदोली जिल्ह्यात गुरुवारी किशोरवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अत्याचारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक केली. एफआयआर नोंदवण्यात टाळाटाळ झाल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

ही घटना ओरवा गावात घडली. बुधवारी रात्री तीन किशोरवयीन मुलांनी सातव्या इयत्तेत शिकणा-या 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. पीडिताच्या नातेवाइकांनी या घटनेची तक्रार बुधवारी रात्रीच पोलिस ठाण्यात केली होती. परंतु पोलिसांनी पीडिताचे वय 18 वर्षाहून कमी लिहिण्यास नकार दिला. त्यावर नाराज झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी ठाणे गाठले. त्यांनी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली. परंतु पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला आणि नागरिकांनी अलीनगर चौकात चक्का जाम केला. त्या ठिकाणी झालेल्या लाठीमारामुळे नागरिक संतप्त झाले. त्यांनी दगडफेक केली.