आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gangotri Temple Damaged Due To Floods In Utterakhand

उत्तराखंडः गंगोत्री मंदिरला गेले तडे, खराब हवामानाचा बचाव कार्याला फटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौरीकुंड- उत्तराखंडमध्‍ये बचाव कार्य अंतिम टप्‍प्‍यात असतानाच खराब हवामानाने पुन्‍हा अडचण निर्माण केली आहे. केदारनाथ आणि गुप्तकाशी येथे बचाव कार्य काही काळासाठी थांबविण्‍यात आले आहे. उत्तराखंडचे मुख्‍यमंत्री विजय बहुगुणा हे आज उत्तरकाशी येथे पाहणी करण्‍यासाठी जाणार होते. परंतु, खराब हवामानामुळे त्‍यांचे हेलिकॉप्‍टर उड्डाण घेऊ शकले नाही.

दुसरी चिंताजनक बाब म्‍हणजे भागीरथी नदीतील पाण्‍याची पातळी सातत्‍याने वाढत आहे. त्‍यामुळे नदीकाठच्‍या 70 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यात आले. सध्‍या 1400 भाविक बद्रीनाथमध्‍ये अजुनही अडकले आहेत. त्‍यांना लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यावर भर राहणार आहे. त्‍यानंतर रुद्रप्रयाग, चामोली आणि उत्तरकाशी या सर्वाधिक प्रभावित परिसरात जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा करण्‍यावर लक्ष केंद्रीत करण्‍यात येणार आहे. या परिसराला सर्वाधिक फटका बसला आहे.

गंगोत्री मंदिरला गेले तडे

उत्तराखंडमधील प्रलयामुळे गंगा नदीचे उगमस्‍थान असलेल्‍या गंगोत्री मंदिराला तडे गेले आहेत. मुसळधार पाऊस आणि ग्‍लेशियरमधून आलेल्‍या पाण्‍यामुळे मंदिराच्‍या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेल्‍याचे लक्षात आले आहे. पाऊस आणि बर्फामुळे मंदिराचे नुकसान होत असल्‍याचे पुजा-यांचे म्‍हणणे आहे. चार धामांपैकी गंगोत्री मंदिर एक आहे. मंदिरात गंगा मातेची प्रतिमा आहे. भागीरथी नदीच्‍या किना-यावर मंदिर आहे. नदीच्‍या प्रत्‍यक्ष उगम स्‍थळापासून मंदिर 18 किलोमीटर अंतरावर आहे.

दुसरीकडे केदारनाथ परिसरात मृतदेहांवर अंत्‍यसंस्‍कार न झाल्‍यामुळे भीषण समस्‍य निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अजुनही 2 हजार मृतदेह या भागात आहेत. त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार होणे आवश्‍यक आहे. धर्मशाळा तसेच हॉटेल्‍समध्‍ये आढळलेल्‍या मृतदेहांवर ब्लिचिंग पावडर टाकण्‍यात आली आहे. त्‍यामुळे मृतदेह कुजण्‍याची प्रक्रीया मंदावेल तसेच रोगराईदेखील पसरणार नाही. बचाव मोहिम अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. परंतु, अजुनही 3 हजार नागरिक बेपत्ता आहेत. त्‍यांना शोधण्‍याचे कामही हाती घेण्‍यात येणार आहे.