आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणात जाट आंदोलनात महिलांवर गँगरेप? हायकोर्ट म्हणाले \'शेमफूल\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाट आंदोलनादरम्यान महिलांवर कथित गॅंगरेपचे प्रकरण समोर आल्यानंतर पंजाब स्टूडट्स यूनियनने जालंधरमध्ये आंदोलन केले. - Divya Marathi
जाट आंदोलनादरम्यान महिलांवर कथित गॅंगरेपचे प्रकरण समोर आल्यानंतर पंजाब स्टूडट्स यूनियनने जालंधरमध्ये आंदोलन केले.
सोनीपत/चंडीगड- आरक्षणाच्या मागणीवरून हरियाणात नुकत्याच झालेल्या जाट आंदोलनादरम्यान महिलांवर गॅंगरेप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोनीपतजवळ मुरथल हायवेवर महिलांचे फाटलेले कपडे आढळल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी ही घटना अफवा असल्याचे म्हटले आहे. पीडित महिलांनी समोर येण्याचे पोलिसांनी आवाहनही केले आहे.

दुसरीकडे, हरिणातील हा प्रकार अत्यंत घृणास्पद असल्याचे पंजाब अॅण्‍ड हरियाणा हायकोर्टाने म्हटले आहे. तसेच याप्रकरणी राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे.

काय आहे प्रकरण?
जाट आंदोलनादरम्यान काही महिलांवर सामुहीक बलात्कार झाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या प्रकाराला पोलिसांनी सुरुवातीला अफवा असल्याचे सांगितले. मात्र, स्थानिकांनी पीडित महिलांचे फाटलेले कपडे सापडल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात शुक्रवारी लक्ष घातले आहे. हरियाणाचे डीजीपी वाय.पी.सिंघल यांनी पीडित महिलांनी समोर येण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी तीन हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहे.
स्थानिकांनी केला पीडित महिलांचे कपडे सापडल्याचा दावा...
- सोनीपत जवळून जाणार्‍या मुरथल हायवेवर काही कपडे सापडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
- 10 मिटरच्या भागात महिलांच्या लॅगिंग्स, जीन्स, अंडरगारमेंट्स व टॉप्स आढळून आले आहे.

आंदोलनाला लागले होते हिंसक वळण...
- गत आठवड्यात जाट आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यादरम्यान काही महिला सामूहीक बलात्काराच्या शिकार झाल्या. बदनामी होईल, या भीतीने पीडित महिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
- जाट अांदोलनाने उग्र रुप धारण केल्यानंतर संपूर्ण राज्यात जाळपोळच्या घटना घडल्या. यादरम्यान महिलांवर नराधमांनी बलात्कार केला असावा, असे स्थानिकांनी म्हटले आहे.
या मोबाइलवर फोन करू शकतात पीडित महिला...
डीआयजी राजश्री सिंह- 9729995000
डीएसपी भारती डबास- 8053882302
डीएसपी सुरेंद्र कौर- 9729990760

हायकोर्ट म्हणाले शेमफूल...
- या घटनेची गंभीर दखल घेत पंजाब व हरियाणा हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे.
- खंडपीठात हे प्रकरण दाखल होताच न्यायाधीश मित्तल म्हणाले,"शेम फुल, वेरी शेम फुल फॉर गव्हर्नमेंट"
- हायकोर्टाने याप्रकरणी हरियाणा सरकारला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण देण्‍याचे निर्देश दिले आहे.
- डीजीपी व एसीएस पातळीवर स्वतंत्र चौकशीचेही आदेश कोर्टाने दिले आहे.
- पोलिसांत तक्रार दाखल झाल्यास या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात येणार असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
- पीडित महिला व प्रत्यक्षदर्शी बंद लिफाफ्यात आपली तक्रार दाखल करू शकतात.
- पीडित महिला घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
- मीडियाने या घटनाचा पर्दाफाश केला आहे. मात्र, पोलिस प्रशासन घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता. अफवा असल्याचे म्हणत आहेत. हे फारच घृणास्पद आहे.

पोलिसांनी काय केली कारवाई?
- पोलिसांनी स्थानिकांच्या दाव्याला अफवा असे संबोधले आहे. चोरीचे प्रकरण असते तर गुन्ह्याची नोंद केली असती असे एसपी अभिषेक गर्ग यांनी सांगितले आहे.
- जर खरंच महिलांवर गॅंगरेप झाला आहे तर महिलांनी पोलिसांसमोर येण्याचे आवाहनही गर्ग यांनी केले आहे. स्थानिकांना सापडलेले कपडे जुने असल्याचेही गर्ग यांनी म्हटले आहे.
- मुरथलचे डीएसपी अजय धनखड यांनी सांगितले, की याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांची कसून चौकशी करण्‍यात आली आहे. आतापर्यंत गँगरेप झाल्याची तक्रार कोणीही केलेली नाही.

पुढील स्लाइडवर पाहा, मुरथल हायवेवर महिलांचे फाटलेले कपडे...
बातम्या आणखी आहेत...