आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडगाव: शाळेतून घरी जाताना नववीच्या विद्यार्थीनीवर गँगरेप, चार पैकी दोन आरोपी अल्पवयीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत/गुडगाव - येथील सेक्टर 46 मध्ये नववीत शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीवर सामुहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडली. शनिवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील चार पैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तर, दोघे फरार आहेत.
पीडित युवतीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनूसार, विद्यार्थीनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर घरी येत होती. तेव्हा दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी तिचा रस्ता अडवला. एका रिक्शातून तिचे अपहरण करुण निर्मणूष्य ठिकाणी तिला घेऊन गेले. तिथे दोन अल्पवयिन विद्यार्थी, रिक्शा चालक विशाल आणि त्याच्यासोबतच्या आणखी एकाने तिच्यावर अत्याचार केले. विद्यार्थीनीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची सर्व हकिकत घरच्यांना सांगितली. त्यानंतर शनिवारी कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली.

गुडगाव पोलिस अधीक्षक (क्राइम) राजेश म्हणाले, की पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरु असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...