आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे मुख्यमंत्र्यांच्या शहरातील सुल्तान मिर्झा, तुरुंगातून सुटल्यानंतर लगेच घातला धुमाकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज नागपूरमधील कुख्यात गुंड आहे. कधीकाळी संतोष आंबेडकरच्या सोबत राहाणारा युवराजची आता स्वतःची गँग आहे. - Divya Marathi
युवराज नागपूरमधील कुख्यात गुंड आहे. कधीकाळी संतोष आंबेडकरच्या सोबत राहाणारा युवराजची आता स्वतःची गँग आहे.
नागपूर - महाराष्ट्राची उपराजधानी आणि मुख्यमंत्र्यांचे शहर सध्या गँगस्टरच्या दहशतीत आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण करणारा कुख्यात डॉन संतोष आंबेकरचा उजवा हात असलेला गँगस्टर युवराज माथनकरसह सहा गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. युवराज आणि त्याच्या गँगवर आरोप आहे की त्यांनी एका व्यावसायिकाच्या घरात घुसून डोक्यावर बंदूक ठेवून खंडणी मागतली. खंडणी मिळाली नाही तेव्हा घरातील दागिने आणि रोकड लुटून नेली. विशेष म्हणजे युवराज माथनकर काही दिवसांपूर्वीच तुरुगांतून सुटला होता.
सुल्तान मिर्झाची करतो कॉपी
> युवराज माथनकर नागपूरचा कुख्यात गँगस्टर आहे. तो कधीकाळी नागपूरचा डॉन संतोष आंबेकरचा उजवा हात मानला जात होता.
> त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत तो निघाला आणि आता त्याचाच नंबर एकचा शत्रू झाला आहे. अवैध धंद्यामधून युवराजने फार कमी काळात कोट्यवधींची दौलत जमा केली आहे.
> या दौलतीबरोबरच त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. येथील सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर 448, 452, 141, 143, 147, 148, 149, 504, 506 (ब) नुसार अनेक गुन्हे दाखल आहेत.
> सुल्तान मिर्झाची नक्कल करणारा हा डॉन अनेक महागड्या कारने फिरतो. 10 वर्षांपूर्वी एका युवकाच्या हत्येच्या प्रकरणात त्याचे नाव आले होते, आणि तो चर्चेत आला.
> तेव्हा संतोषने त्याला त्याच्या गँगमध्ये एन्ट्री दिली होती. थोड्याच दिवसांत तो संतोषचा सर्वात वफादार म्हणून ओळखला जाऊ लागला.
> त्याच्या गुन्ह्यांची गती एवढी होती की तो लवकरच संतोष आंबेकरलाही ओव्हरटेक करु लागला. एका गुंडाला दुसरा गुंड त्याच्या पेक्षा मोठा होत असलेले कधीही रुचणारे नव्हते.

सुल्तान मिर्झासारखी स्टाइल
> 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या चित्रपटातील सुल्तान मिर्झा हा युवराजचा आदर्श आहे. त्याच्या सारख दिसणं, त्याच्या सारखं वागणं हे त्याला आवडतं. त्याने त्याचा पेहरावही सुल्तान मिर्झा स्टाइलचा केला आहे.
> एवढेच काय त्याने मिशाही सुल्तान मिर्झा सारख्या ठेवल्या आहे. पांढरा शर्ट, पांढरी पँट आणि त्याचा बुटही पांढराच असतो. त्याच्या गँगचे लोकही त्याला सुल्तान मिर्झा म्हणतात.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, व्यावसायिकाच्या घरात कसा घातला धुमाकूळ...
> लग्न घरात घुसून डोक्यावर बंदूक ठेवून मागितली खंडणी
बातम्या आणखी आहेत...