आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॅक्सी चालकाने हिरवाईसाठी घालवले २२ हजार, सोबूज रथाद्वारे एसी कारचा अनुभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - एखाद्याने किती पर्यावरण सजगता दाखवावी याचे उदाहरण कोलकात्यातील टॅक्सी चालकाने घालून दिले. या सामान्य टॅक्सीचालकाने आपल्या पर्यावरण ध्येयाला साध्य करण्यासाठी २२ हजार रुपयांची गुंतवणूक केवळ हिरवाईसाठी केली.

येथील टॅॅक्सीचालक धनंजय चक्रवर्ती यांनी स्वत:च्या कारवरच चालता फिरता बगिचा फुलवला आहे. त्यांनी टॅक्सीच्या छतावर गवत लावले आहे. कारच्या डॅशबोर्ड व मागच्या भागावर फुलांची रोपटी वाढवली आहेत.

रोपट्यांना केले संवादी
कारच्या कुंड्यांवर आणि गवताच्या ट्रेवर बंगाली भाषेत ‘आमाके बांचते दिन’ अर्थात आम्हाला जगू द्या, असा संदेश लावला आहे. रोपटी माणसाला आवाहन करताहेत असेच ते भासते. धनंजय यांना स्थानिक लोक ‘गेछो बापी’ म्हणजे वृक्षांवर राहणारी व्यक्ती या नावाने संबोधतात. बापी ग्रीन टॅक्सी नावाचे पेजही फेसबुकवर आहे.

असा लागला ध्यास
धनंजय यांना ३ वर्षांपूर्वी मागच्या सीटवर मद्याची सुबक बाटली मिळाली. त्यात रोपटे लावून त्यांनी टॅक्सीच्या मागच्या भागात ते ठेवले. काही आठवड्यांत ते बहरले. प्रवाशांनी याची प्रशंसा केली व प्रोत्साहित केले. त्यानंतर संपूर्ण टॅक्सीत हिरवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे धनंजय सांगतात.
बातम्या आणखी आहेत...