आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाऊ शहीद झाल्‍याचे कळताच बहिनीने फोडला टाहो; म्‍हणाली आता आम्‍हाला कोण सांभाळणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहतास- जम्‍मुच्‍या हाजीन परिसरात शनिवारी सुरक्षा रक्षकांनी लश्कर-ए-तैयबाच्‍या 6 अतिरेक्‍यांना कंठस्‍नान घातले. या चकमकीदरम्‍यान बिहारच्‍या रोहतास जिल्‍ह्यातील रहिवाशी असलेले गरूड कमांडो ज्‍योती प्रकाश यांना वीरमरण आले. ही बातमी त्‍यांच्‍या घरी कळताच कुटूंबातील सदस्‍यांना धक्‍का बसला. त्‍यांच्‍या पत्‍नीला रडतांना पाहून त्‍यांच्‍या चार वर्षाच्‍या मुलीने विचारले मम्‍मी पप्‍पा केव्‍हा येणार आहे, हे एकताच सर्वांचे हेलावून गेले. 


शहीद ज्‍योती प्रकाश यांच्‍यावर होती तीन बहिनींच्‍या लग्‍नांची जबाबदारी 
ज्‍योती प्रकाश शहीद झाल्‍याची बातमी कळताच त्‍यांच्‍या काराकाट पोलीस स्‍टेशन हद्दितील गावात शोकाकूल वातावरण पसरले. कुटूंबातील सदस्‍यांचे रडून-रडून बेहाल झाले होते. पाच भावंडामध्‍ये ज्‍योती हे सर्वात मोठे होते. एका बहिनीचे लग्‍न झालेले असून दुस-या बहिनीचे लग्‍न होणार होते. ज्‍योती यांना जिज्ञासा नावाची चार वर्षाची मुलगी आहे. कुटूंबाची पुर्ण जबाबदारी ही  त्‍यांच्‍यावरच होता. 2010 मध्‍ये ज्‍योती यांचा विवाह रोहतास जिल्‍ह्यातील सुर्यपूरा स्‍टेशनच्‍या हद्दितील बारूण गाव येथील मुलीशी झाला होता. 2005 मध्‍ये ते सैन्‍यात भरती झाले होते. कारपोरल रँकच्‍या गरूड कमांडो पदावर ते कार्यरत होते. 

 

वडील म्‍हणाले आता मी मुलींचे लग्‍न कसे करू
शहीद जवान ज्‍योती प्रकाश यांचे वडील म्‍हणाले की, बलिदानावर सरकार सहानुभूती दाखवत आहे, पण सरकारचे सैन्‍यावर काही लक्ष नाही. मला गर्व आहे की, माझा मुलगा देशासाठी शहीद झाला. आता तर माझ लगळच संपल आहे. मला एकच मुलगा होता. त्‍याच्‍या तीन बहिनींच्‍या लग्‍नाची  जबाबदारी त्‍याच्‍या वर होती. आता मी त्‍यांच लग्‍न कस करू अस म्‍हणत त्‍यांनी टाहो फोडला.

 

पुढील स्‍लाईडवा पाहा आनखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...