आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा तरुण बोलायचा भूतांसोबत, ज्या जागेवर भूताटकी तिथे मुद्दाम जायचा; त्याचा मृत्यूही ठरला गूढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूत-प्रेतांचा बालेकिल्ला समजला जाणारा राजस्थानमधील भानगड किल्ला नेहमीच चर्चेत राहिला आहे. येथे तंत्र-मंत्र जाणणारे (पॅरानॉर्मल सोसायटी) लोक नेहमीच फिरत असतात. त्यातील कोणी भूत पाहिल्याचा दावा करतो तर काही या फक्त अफवा असल्याचे छातीठोक सांगतात. विशेष म्हणजे भारतीय पुरातत्व विभागानेही सूर्यास्तानंतर येथे जाण्यास बंदी केली आहे. परंतु,  पॅरानॉर्मल रिसर्चर गौरव तिवारी त्याच्या टीमसह येथे पोहोचला होता. त्याने एक रात्र येथे घालावली आणि भूतांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याने हा किल्ला चर्चेत आला होता.
 
कसा झाला होता गौरवचा मृत्यू?
- अशी माहिती आहे की भानगडवर संशोधन केलेल्या गौरवचा दिल्लीतील त्याच्या राहात्या घरी बाथरुममध्ये मृत्यू झाला. येथे तो त्याच्या कुटुंबासह राहात होता.
- त्याची पत्नी आणि वडिलांनी सांगितले, आम्ही एक किंकाळी ऐकली आणि बाथरुमच्या दिशेने धावलो. पाहातो तर गौरव जमीनीवर मृतावस्थेत पडलेला होता.
- पोलिसांच्या माहितीनुसार, गौरवच्या गळ्यावर काळा चट्टा आढळून आला होता. हे व्रण एखाद्याने फाशी घेतल्यानंतर असतात तसे होते.
 
कमर्शियल पायलट होता गौरव
- गौरव मुळचा बिहारमधील होता. तो बॉस्टन येथे कमर्शियल पायलट होता.
- त्याने अमेरिकेतील प्रोफेशनल पायलटची ट्रेनिंग अर्धवट सोडली होती आणि भारतात परतला होता. येथे येऊन त्याने पॅरानॉर्मल सोसायटी सुरु केली होती.
- अमेरिकेतील वास्तव्यात त्याने पॅरानॉर्मल विद्येचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने जगातील हॉन्टेड प्लेसेस तपासणे सुरु केले होते.
 
पाहा व्हिडिओ आणि काही फोटोज
बातम्या आणखी आहेत...