आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतांच्या बालेकिल्ल्यात याने घालवली होती रात्र, आत्म्यांना विचारले प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरवने (इन्सेट) पाच वर्षांपूर्वी पूर्ण एक रात्र येथे मुक्काम केला होता. - Divya Marathi
गौरवने (इन्सेट) पाच वर्षांपूर्वी पूर्ण एक रात्र येथे मुक्काम केला होता.
जयपूर (राजस्थान) - भूत-प्रेतांचा बालेकिल्ला समजला जाणारा राजस्थानमधील भानगड किल्ला नेहमीच चर्चेत राहिला आहे. येथे तंत्र-मंत्र जाणणारे (पॅरानॉर्मल सोसायटी) लोक नेहमीच फिरत असतात. त्यातील कोणी भूत पाहिल्याचा दावा करतो तर काही या फक्त अफवा असल्याचे छातीठोक सांगतात. विशेष म्हणजे भारतीय पुरातत्व विभागानेही सूर्यास्तानंतर येथे जाण्यास बंदी केली आहे. अशातच पॅरानॉर्मल रिसर्चर गौरव तिवारी त्याच्या टीमसह येथे पोहोचला होता. त्याने एक रात्र येथे घालावली आणि भूतांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र नुकताच त्याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याने हा किल्ला चर्चेत आला.

भानगड किल्ल्यातील भूतांना कोणते प्रश्न विचारले, गौरव तिवारी का आले चर्चेत
- गौरव तिवारीचा दिल्लीतील द्वारका सेक्टरमधील त्याच्या फ्लॅटमध्ये 7 जुलै रोजी मृतदेह आढळून आला. फ्लॅटच्या बाथरुममध्ये त्याचा मृतदेह होता.
- त्याच्या मृत्यूला तांत्रिक शक्ती जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
- गौरव जवळपास पाच वर्षांपूर्वी त्याच्या टीमसह भानगड किल्ल्यात संशोधनासाठी गेला होता.
- यावेळी तो भूतांवर संशोधन करण्याची सर्व उपकरणे घेऊन तिथे पोहोचला होता.
- येथील रहस्यमयी किल्ल्यात एक रात्र मुक्काम करुन त्याने भूतांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता.
- रात्रभर त्याने भूतांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना अनेक प्रश्न विचारले होते. त्यात येथे प्रसिद्ध असलेली कथा म्हणजे महाराणी रत्नावतीची. महाराणीचा येथे वास आहे का ? असा प्रश्न त्याने विचारला होता.
- त्यासोबतच सिंधिया नावाचा तांत्रिक येथे राहातो का, असाही प्रश्न गौरवने किल्ल्यात विचारला होता.
- किल्ल्याच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन रात्रभर गौरव आणि त्याची टीम असे प्रश्न विचारत होती, मात्र त्यांच्या एकाही प्रश्नाचे उत्तर किल्ल्यातून मिळाले नाही.
पुढील स्लाइडमध्ये
> काय आहे भानगड मधील भूतांची कहाणी
> कसा झाला गौरवचा मृत्यू
> कमर्शियल पायलट होता गौरव
बातम्या आणखी आहेत...