आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरी लंकेश हत्या प्रकरण; लेखक विक्रम संपत यांचा जबाब एसआयटीने नोंदवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पत्रकार-सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) लेखक विक्रम संपत यांचा जबाब नोंदवला आहे.  

संपत म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी मी लंडनहून परत आल्यानंतर एसआयटीचे अधिकारी माझ्या घरी आले आणि त्यांनी गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात माझा जबाब नोंदवला. एसआयटीचा दृष्टिकोन ‘सकारात्मक’ नव्हता असे मला वाटते, तरीही मी त्यांना संपूर्ण सहकार्य केले. गौरी लंकेश यांनी माझी जाहीर बदनामी केली होती. मी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली असती किंवा त्याविरोधात लिहिले असते तर एसआयटीच्या या कारवाईला काही अर्थ राहिला असता. गौरी यांनी ज्यांच्या विरोधात टीका केली त्या प्रत्येकाची चौकशी एसआयटी करणार आहे का? निर्भय पत्रकार म्हणून गौरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक व्यक्तींवर टीका केली होती.  मग मला आणि माझ्या वृद्ध पालकांनाच त्यासाठी का लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न संपत यांनी विचारला. 

गौरी लंकेश यांनी लिहिलेले कुठलेही लेख मी वाचले नाहीत किंवा त्याला उत्तरही दिले नाही. कारण प्रत्येक मतावर प्रतिक्रिया देणे मी महत्त्वाचे मानत नाही, असेही विक्रम संपत यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...