आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gauri Murder Case Cctv Footage Latest Crime News Lucknow News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'फिजिकल रिलेशन\'नंतर झाली लखनौच्या गौरीची हत्या; CCTV फुटेज आले समोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- गौरी हत्याकांडप्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज 'dainikbhaskar.com'ला प्राप्त झाले आहे. घराबाहेर पडल्यानंतर गौरी एका युवकासोबत दुचाकीवरून जाताना फुटेजमध्ये दिसले आहे. विशेष म्हणजे गौरी तिच्या मर्जीने युवकासोबत जाताना दिसत आहे. दुसरीकडे, शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर गौरीची हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

लखनौमधील अमिनाबाद भागात राहाणारी गौरी श्रीवास्तवचा मृतदेह गेल्या मंगळवारी एका पोत्यात आढळला होता.गौरीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले होते.गौरीची हत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. हत्येनंतर कटरच्या साह्याने गौरीच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून ते पोत्यात भरण्यात आले होते. गौरी हत्याकांडात जवळील व्यक्तीचा हात असल्याचा संशय पो‍लिसांनी वर्तवला आहे.

CCTV FOOTAGE मध्ये दिसली बाइकवरून जाताना गौरी...
गौरी स्वमर्जीने युवकासोबत जाताना फुटेजमध्ये दिसले आहे. तिच्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी केली नसल्याचे दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरी अनेक युवकांच्या संपर्कात होती. त्यामुळे दुचाकीस्वार युवक कोण? याचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, गौरी एक फेब्रुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घराबाहेर निघाली होती. तिने पांढरा कुर्ता, निळा सलवार आणि पांढरे जॅकेट परिधान केले होते. घरापासून जवळच असलेल्या जुन्या आरटीओ चौकाकडे ती वळताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले आहे. तेव्हा एक वाजून चौदा मिनिटे आणि एको‍णिस सेकंद झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा घटनेचा व्हिडिओ आणि वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण...