आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, गे-लेस्बियन कपल्स कोणत्या कोडवर्डमध्ये एकमेकांशी करतात चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ : फ्लोरिडा येथे 'पल्स' एलजीबीटी नाइट क्लबमध्ये रविवारी झालेल्या फायरिंगमध्ये 50 लोक मारले गेले. हा एक 'गे' नाइट क्लब होता. फायरिंग करणारा हल्लेखोर मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे आणि 'गे' कपल्सला पाहून हा व्यक्ती खूप रागात येत होता. 'गे' कपल्सविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी dainikbhaskar.comच्या टीमने राजधानीतील काही 'गे कपल्स'सोबत चर्चा केली. त्यानंतर यांच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी समोर आल्या.

स्पेशल भाषा आणि कोडवर्डचा वापर
गे/लेस्बियन समाज पोलिसांपासून दूर राहण्यासाठी स्पेशल भाषा नि कोडवर्डमध्ये चर्चा करतात. यांचे पार्टनर्स एक मेल आणि एल फिमेलप्रमाणे असतात. जे लोक मेल आणि फिमेल दोघांकडेही आकर्षित होतात त्यांना 'डबल डेकर' म्हणतात.

पार्टनरसाठी ठेवतात 'करावा चौथ'चे व्रत
ठाकुरगंज येथे वास्तव्यास असलेले नीरज सोनकर वयाच्या १२-१३ वर्षापासून मुलांकडे आकर्षित होऊ लागले होते. त्यांच्या पार्टनरसोबत त्यांचे रिलेशन जवळपास 20 वर्ष होते. त्याच्यासाठी ते करावा चौथचे व्रतसुद्धा ठेवत होते. सर्वप्रकारे पती धर्माचे पालन करत होते. परंतु पार्टनरने त्यांना न सांगता लग्न केले. त्यानंतर नीरज यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घरात कोणालाही ते 'गे' असल्याचे माहिती नाही.

अनैसर्गिक आहे संबंध
अमीनाबाद येथील ओमप्रकाश यांच्यावरील आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले होते. भाऊ-वाहिनीने यांना टाकून दिले होते. त्यानंतर त्यांचा पार्टनर नीरज यांनी त्यांना सांभाळले. ते सांगतात की, 'हा समाज आम्हाला आमच्या पद्धतीने केव्हा जगू देईल. मी आणि नीरज एकत्र फिरतो, डेटवर जातो परंतु आम्ही लग्न करू शकत नाहीत. आमचे संबंध अनैसर्गिक आहेत आणि लखनऊसारख्या शहराची मानसिकता खूप मागासलेली आहे. आम्ही एकत्र राहू इच्छित आहेत परंतु हा समाज आम्हाला जगू देणार नाही.'

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गे/लेस्बियनचे खास कोडवर्ड्स आणि काही खास गोष्टी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)