आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातून आलेल्या गीताला करायचे आहे लग्न, मूूकबधिर संस्थेतून झाली होती गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानातून आपल्या मायभूमीत-भारतात परतलेल्या मूकबधिर - गीताला लग्न करायचे आहे. गुरुवारी अचानक ती मध्य प्रदेशातील इंदूरच्या मूकबधिर संस्थेतून गायब झाली होती. संस्थेला ती गायब झाल्याची कल्पनाही आली नव्हती. तिला शोधण्यासाठी तीन पोलिस ठाण्याची मदत घेण्यात आली. नंतर ती इंदूरच्या चंदननगर भागात सापडली. पळून जाण्याचा हा तिचा पहिलाच प्रयत्न नव्हता, असे सांगण्यात आले. या आधीही ती गायब झाली होती, पण प्रयत्न करून  तिला यातून शोधून काढण्यात आले.  
 
गीताला आता लग्न करायचे आहे. तिचे या मूकबधिर संस्थेत मन लागत नाही. अनेकदा तिने लग्नाची इच्छा बोलून दाखवली आहे. सरकारने तिच्या आई वडिलांचा पत्ता शोधला नाही.  
 
गीताला अभ्यासात रस नव्हता  : संस्थेचे प्रबंधक उषा पंजाबी यांनी सामाजिक न्याय व अपंग कल्याण विभागास एक पत्र लिहिले आहे. यात गीताला अभ्यास रस नाही. तिने केअरटेकर फुलमतीला तंग केले आहे.  फुलमतीला तिच्यावरच लक्ष ठेवावे लागते. तर तिच्याकडून नवे उपक्रम करून घ्यावेत, असे आदेश दिले.
 
बातम्या आणखी आहेत...