आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जजचे होते विवाहबाह्य संबंध, म्हणूनच केला माझ्या मुलीचा खून \'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला / गुडगांव - गुडगावचे मुख्य न्यायदंडाधिकारी रवनीत गर्ग यांची पत्नी गीतांजलीच्या हत्येचे प्रकरण दिवसेंदिवस गुढ होत चालले आहे. आता गीतांजलीचे वडील ओमप्रकाश अग्रवाल यांनी मुलीच्या हत्येसाठी सुपारी दिल्याचा आरोप गर्ग यांच्यावर केला आहे.

ते म्हणाले, 'गीतांजलीने सांगितले होते, की रवनीत तीन-तीन तास फोनवर बोलत असतात. त्यांचे दुस-या महिलेसोबत संबंध असल्याचा संशय आहे.' गीतांजलीच्या भावानेही न्यायदंडाधिकारी गर्ग यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे सांगत, 'त्यामुळेच माझ्या बहिणीची त्यांनी हत्या घडवून आणली', असा आरोप केला आहे.

या आरोपांबाबत रवनीत गर्ग यांनी अद्याप खुलासा केलेला नाही. दुसरीकडे, घटनेच्या पाच दिवसानंतर घटनास्थळाहून पोलिसांना सहा रिकामे काडतूस मिळाले आहेत. पोलिसांनी हा महत्त्वाचा पुरावा असल्याचे म्हटले आहे.

मुलगा न झाल्याने टोमणे
2007 मध्ये लग्नात महागड्या वस्तू देण्यात आल्या होत्या. पण दोन्ही वेळी मुलीच झाल्याने सासरी गीतांजलीला टोमणे मिळत होते, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. गीतांजली यांना लागलेल्या तीन गोळ्या व डोक्यावरील जखमेमुळे आत्महत्येचे रूप दिले जात आहे. परंतु हा खूनच दिसतो, असे म्हणत तिच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली.