आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलच्या कर्मचा-याला तालिबानी शिक्षा, चोरीचा आरोप करुन कापली करंगली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहजहांपूर(उत्तर प्रदेश) - शहरातील प्रसिध्‍द हॉटेलमध्‍ये एका कर्मचा-याला चोरी केल्याच्या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापकाने तालिबानी शिक्षा दिली.त्याने चोरीचे आरोप असलेल्या कर्मचा-याची करंगली कापली.हॉटेलच्या कर्मचा-यांनी त्याला हॉस्पीटलमध्‍ये दाखल केले असून त्याची करंगली जोडण्‍यात आली.त्या व्यवस्थापकाविरुध्‍द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे व त्याचा शोध सुरु आहे.व्यवस्थापकाला मला नोकरीवरुन काढायचे होते.त्याला मी विरोध केल्यानंतर माझ्यावर चोरीचा आरोप केला गेला.माझी करंगली व्यवस्थापकाने कापली,असा आरोप त्या पीडित कर्मचा-याने केला आहे.
ही घटना बाजारक्षेत्र येथील हॉटेल रॉयल पन्ना येथे घडली आहे.येथे काम करणारा त्रिलोक सिंहवर हॉटेलचा व्यवस्थापक नागेंद्र रॉयने गॅस सिलेंडर चोरल्याचा आरोप करुन त्यास जबरदस्त मारहाण केली होती.नंतर रॉयने चाकूने उजव्या हाताची करंगली कापून टाकली.