आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशिकलांना सामान्य कैद्यासारखी वागणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - अण्णाद्रमुकच्या महासचिव व्ही. के. शशिकला यांना तुरुंगामध्ये कोणत्याही वेगळ्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. वेगळे स्नानगृह, पाण्याचे हीटर, वातानुकूलित खोली, पलंग आणि गादी अशा कोणत्याही खास सुविधा बंगळुरूच्या केंद्रीय कारागृहात नाहीत, असे तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे. माहिती अधिकाराखाली याविषयी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर तुरुंग प्रशासनाने खुलासा दिला आहे. चेन्नई येथील वकिलाने ही माहिती मागवली होती. 

पोलिस उपमहानिरीक्षक पाराप्पाना अग्रहारा यांनी शशिकला यांना दूरचित्रवाणी संच दिल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त इतर कोणतीही सुविधा दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दोषी आढळल्यानंतर त्या शिक्षा भोगत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना व त्यांच्या दोन नातलगांना ही शिक्षा सुनावली होती. २० फेब्रुवारी रोजी. राजवेलायुथम यांनी माहिती अधिकाराखाली तुरुंग प्रशासनाला सेलविषयी माहिती मागितली. 
बातम्या आणखी आहेत...