आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वातावरण वाचवा, शाकाहारी व्हा'चा संदेश घेऊन जगभ्रमंतीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना- 'वातावरण-पर्यावरण वाचवा आणि शाकाहारी व्हा,' हा संदेश घेऊन मार्च २०१४ मध्ये कारमनने जर्मनीतून आपला प्रवास सुरू केला होता. त्या म्हणतात, मी मांस खात नाही. तसेच दूध वा त्याच्या उत्पादनांचा मी खाण्यात वापर करत नाही. हे करणे इच्छा असेल तर अवघड मुळीच नाही.

जर्मनीतून निघालेल्या कारमन या धाडसी महिलेने आतापर्यंत १९ देशांचा (पोर्तुगाल, ऑस्ट्रिया, स्पेन, सर्बिया, रोमानिया, तुर्की, आर्मेनिया, किरगिझस्तान, इराण, पाकिस्तान इ.) ३१,००० किमीचा प्रवास पूर्ण केला असून २० वा देश भारतात त्या आल्या आहेत. ५० देशांत जाण्याची त्यांची इच्छा असून त्या शाकाहारी व्हा आणि भुकेल्या लोकांना जेवण मिळायलाच हवे हा संदेश प्रवासादरम्यान देत आहेत. त्या म्हणतात, मला आतापर्यंत काहीही अडचण आली नाही. खूप चांगले लोक भेटले. भारतात मला खूप काही बघायला शिकायला मिळेल असे वाटते. दररोज त्या १०० किलोमीटर सायकल चालवतात, त्यापेक्षा जास्त नाही. या जगभ्रमंतीच्या खर्चासाठी त्यांनी २८ वर्षे काम केले पैसे जमवले.
कारमनयांनी सांगितले की, १८.५ किलोच्या सायकलमध्ये त्यांनी गरजेच्या सर्व वस्तू ठेवल्या आहेत. यात राहण्यासाठी तंबूपासून ते तंत्रज्ञानयुक्त किचनचे सामान आणि कपडे त्यात आहेत. कॅमेरा, एमपी प्लेयर, ई-रीडर, हेडलॅम्प आणि नेव्हिगेटरचा समावेश आहे. या सर्व उपकरणांना सायकलवर लावलेल्या यूएसबीच्या माध्यमातून त्या चार्ज करतात. सायकलच्या दुरुस्तीचे सर्व सामान आणि प्रथमोपचाराच्या पेटीसह, साइन लँग्वेजचे एक पुस्तकही त्या आपल्याजवळ सतत ठेवतात. यामुळे कोणत्याही गोष्टीमुळे त्यांना अडचण होत नाही. किचनच्या सामानात गॅस बर्नरदेखील त्या बरोबर ठेवतात. त्यामुळे त्यांना कुठेही खाण्याच्या अडचणीशी सामना करावा लागत नाही.