आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Get Out!\' Haryana Sports Minister Anil Vij Tells Woman IPS Officer

हरियाणा सरकारने महिला SP ची केली बदली, मंत्री म्हणाले होते- Gate Out

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत - हरियाणा सरकाने फतेहाबादच्या महिला पोलिस अधिकारी एसपी संगीता कालिया यांना पदावरुन दूर केले आहे. त्यांना अजून कुठेही पोस्टिंग देण्यात आली नसून सूत्रांच्या माहितीनूसार त्यांना प्रतिक्षायादीत ठेवण्यात आले आहे. एसपी संगीता कालिया यांच्यासोबत एक दिवसापूर्वीच (शुक्रवार) हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांच्यासोबत खडाजंगी झाली होती. आरोग्यमंत्री विज यांनी एसपी कालिया यांना गेट आऊट म्हणत तेथून जाण्यास सांगितले होते. मात्र एसपी कालिया यांनी माझी कोणतीही चूक नाही, असा दावा करत बाहेर जाण्यास नकार दिला होता.

काय आहे प्रकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी संसदेत आयडिया ऑफ इंडियाची उदाहरणावर उदाहरणे देताना म्हणाले की, "आयडिया ऑफ इंडिया - यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता' याचा अर्थ "जेथे महिलांची पूजा होते, त्यांना मान दिला जातो, तेथेच देवतांचा वास असतो.' त्याच वेळी दिल्लीलगतच्या हरियाणात भाजप सरकारचे मंत्री त्याच्या विरुद्ध आचरण करताना दिसले. एका महिला पोलिस अधिकाऱ्याला मंत्र्यांनी भर बैठकीत अपमानित करून बैठकीतून बाहेर जाण्याचे फर्मान सोडले.

पूर्ण घटनाक्रम असा : फतेहाबादमध्ये आरोग्य व क्रीडामंत्री अनिल विज एक बैठक घेत होते. विषय होता परिसरातील अवैध दारूची वाढती विक्री. विज यांच्या बाजूलाच एसपी संगीता कालिया बसल्या होत्या. काही ग्रामस्थांनी तक्रार केली,"साहेब, गावात बेकायदा दारू विक्री होते. अमली पदार्थांचीही विक्री होते. वस्तीत ठेके आहेत.' विज यांनी एसपी कालियांना विचारले, "मॅडम, काय मॅटर आहे? पोलिस हे रोखत का नाही.' एसपींनी उत्तर दिले, - पोलिस आपले काम करत आहेत. तत्काळ उत्तर मिळाल्याने मंत्री नाराज झाले. विज म्हणाले, "पोलिसांचीच मिलीभगत नाही?' संगीता कालिया, तत्परतेने म्हणाल्या, - दारू तर सरकारच विकायला लावते. परवाने तेच देते. यावर मंत्री विज यांचे संतुलन बिघडले.
दोघांत जोरदार शाब्दिक चकमक झडली. ती अशी....वाचा पुढील स्लाईडवर....