आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 अल्पवयीनसह 4 जणांच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये ओतले पेट्रोल, मोबाइल चोरीच्या शंकेतून मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन अल्पवयीन मुलांवर दिल्लीत शस्त्रक्रिया करण्यात आली. - Divya Marathi
दोन अल्पवयीन मुलांवर दिल्लीत शस्त्रक्रिया करण्यात आली.
गाझियाबाद (उत्तर प्रदेश) - गाझियाबाद जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलांसह ४ जणांना बेदम मारझोड करुन त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल ओतण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या सर्वांवर एक मोबाइल फोन चोरीचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यातील एक समाजवादी पक्षाचा स्थानिक नेता आहे.
ग्रामीण पोलिस अधिक्षक राकेश पांडे यांनी सांगितले, 'घटना 14 ऑक्टोबर रोजी घडली होती. आरोपींपैकी एक - रिज्जू हा समाजवादी पक्षाचा स्थानिक पदाधिकारी आहे. त्याची गाझियाबादमधील लोनी परिसरात दुध डेअरी आहे. त्याचा भाऊ देखील या प्रकरणात आरोपी आहे.'
- 'रिज्जूला शंका होती, की जहीर बेग(17), गुलजार (16), फिमो आणि फिरोज (दोघांचे वय 25 वर्षे ) यांनी त्याचा मोबाइल चोरला आहे.'
- 'यावर रिज्जूने चौघांना आपल्या डेअरीवर बोलावून घेतले. त्यानंतर आपले दोन साथीदार - अकील आणि नदीम यांना बोलावून चौघांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल ओतले.'
दोन पीडितांचे दिल्लीत झाले ऑपरेशन
- पोलिसांनी सांगितले, की चौघांना सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते, तेथून त्यांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.
- जहीर आणि गुलजार यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानतंर त्यांना दिल्लीतील गुरु तेग बहादूर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. येथे त्यांच्यावर स्टूल पासिंग टॅक्ट बायपास सर्जरी करण्यात आली.
- पोलिसांनी आरोपींवर कलम 323, 504, 506, 377 आणि पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...