आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांच्या या मुलीचा You Tube वर बोलबाला; जातियवादाला देते आव्हान, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर - तिचे वय काही फार नाही, मात्र तिच्या इच्छा- आकांक्षा आकाशाला गवसणी घालणाऱ्या आहेत. तिच्या बोलण्यात आणि आवाजात एक वेगळाच आत्मविश्वास झळकतो. ना मुलगी असल्याचा दुय्यमभाव, ना उपेक्षित कुटुंबात जन्मल्याचा कमीपणा तिला वाटतो. तिच्या गीतांमध्ये समता, न्याय आणि समाजाबद्दलच्या अभिमानाचे भाव असतात. 'फिर कि होया जे मैं धी हां' आणि 'डेंजर चमार' तिच्या या गीतांचे यू-ट्यूबवर लाखो चाहते आहेत. आपल्या गीतातून ती आपल्या जातीचे महत्त्व आणि उद्धारकर्त्यांचा गौरव करते.

17 वर्षांच्या गिन्नीची कहाणी
- 17 वर्षांची गिन्नी माही आपल्या गीतांमधून दलितांचा गौरव करते. ती अशा शहरात राहाते जिथे जातियवादामुळे अवघ्या दीड किलोमीटर परिसरात सात स्मशानभूमी आहेत.
- या वातावरणात वाढलेली गिन्नी अभिमानाने गाणे गाते.

यू-ट्यूबवर प्रसिद्ध आहे गिन्नी
- सध्या यू-ट्यूबवर गिन्नीचे 'कुर्बानी देनो डरदे नहीं, रैंहदे है तैयार, हैगे असले तो वड्डे डेंजर चमार' हे गाणे धूम करत आहे.
- मागास समाजातून आलेली आणि आपल्या गौरवचे गीत गाणारी गिन्नी काही पहिली कलाकार नाही. पंजाबात याआधी 'मुंडे चमारां दे' सारखी अनेक गीते प्रसिद्ध झाली आहेत.
- चमकीला, राम लाल धीर, जे.एच. ताजपुरी, राज डडराल, रानी अरमान यासारख्या अनेक कलाकारांनी दलित जातींसंबंधीचा गौरवशाली इतिहास आपल्या गीतांमधून मांडलेला आहे.

12वी मध्ये 77 टक्के गुण
- गुजरातमधील उणा येथे दलित असल्यामुळे आणि दलितांचे पिढीजात काम केल्यामुळे एकीकडे तरुणांना मारहान होत आहे.
- त्याचवेळी 17 वर्षांची गिन्नी दलित समाजासोबत होणाऱ्या भेदभाव, अत्याचाराविरोधात जागृती निर्माण करण्याचे काम करत आहे.
- गिन्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित तरुणी आहे. त्यांचे विचार समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचे काम ती आपल्या गीतांमधून करत आहे.
- पंजाबातील म्यूझिक बँड 'चमार पॉप'साठी ती गाणी गाते. तिच्या बँडमध्ये पंजाबी लोकगीत, रॅप आणि हिप-हॉप असतात. त्यासोबतच थिरकायला लावणारे संगीत असते.
- गिन्नीचे खरे नाव आहे गुरकंवल भारती. मात्र आता जग तिला गिन्नी नावाने ओळखते. जर तुम्ही गिन्नीची गिते अजून ऐकली नसतील, तर तुम्ही फार काही मिस केले आहे.
- गिन्नी माही फक्त 7 वर्षांची होती तेव्हापासून गाणे गाते, मात्र तिला ओळख 17 व्या वर्षी मिळाली आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गिन्नीचे निवडक फोटोज् आणि इन्फोग्राफिक्समधून जाणून गिन्नीचे विचार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...