आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Giriraj Singh Need Two Kid Rule For All Religions To Keep Hindu Daughters Safe

गिरिराजसिंह म्हणाले- हिंदू-मुस्लिमांना हवी 2-2 मुले, तेव्हाच मुली राहतील सुरक्षित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी दोन आपत्यांवरुन केलेले वक्तव्य मोठ्या वादाचे कारण ठरू शकते. ते म्हणाले, जर भारतात दोन आपत्यांचा कायदा केला गेला नाही तर मुली सुरक्षित राहाणार नाहीत. होऊ शकते पाकिस्तान प्रमाणेच आपल्याही त्यांना बुरख्यात ठेवावे लागेल.

लोकसंख्या नियंत्रणावर काय म्हणाले मंत्री
- गिरिराजसिंह यांनी बिहारमधील पश्चिम चंपारण येथे बुधवारी भाषण केले.
- इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सिंह म्हणाले, 'हिंदूना दोन आणि मुस्लिमांनाही दोनच मुले असली पाहिजे. आपली लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. बिहारमध्ये सात जिल्हे असे आहेत जिथे आपली लोकसंख्या कमी होत चालली आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या नियमात बदल करावा लागेल, तेव्हाच आपल्या मुली सुरक्षित राहातील. नाहीतर पाकिस्तान प्रमाणे आपल्या मुलींना बुरख्यात बंद करुन ठेवावे लागेल.'
- गिरिराज यांचा रोख बिहारमधील किशनगंज आणि अररिया जिल्ह्यातील लोकसंख्येकडे होता. येथे मुस्लिमांच्या तुलनेत हिंदूंची संख्या घटत चालली आहे.

हिंदूंची संख्या दिवसेंदिवस होत आहे कमी
- गिरिराजसिंह म्हणाले,'स्वातंत्र्यानंतर देशातील हिंदूंची संख्या 90 टक्के होती. आज ती कमी होत-होत 72-74 टक्क्यांवर आली आहे.'
- 'ज्या पद्धतीने आम्ही आर्यावर्त (भारताचे जूने नाव) आणि जम्बूद्विप गमावले आहे, त्याचप्रमाणे भारतवर्षही आपल्या हातातून जाईल.'
- गिरिराज म्हणाले, 'साधू-संत धर्माला वाचवू शकतात, त्यासाठी त्यांनी वर्षभर आपली धर्मयात्रा सुरु ठेवली पाहिजे.'
पुढील स्लाइडमध्ये वाचा, गिरिराज यांचे वादग्रस्त वक्तव्य