बिहार इलेक्शन डेस्क -ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी आज (रविवार) आज
आपल्या टि्वटर पेजवर एक व्हिडियो शेअर केला. यामध्ये आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी हे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर खुनाचा आरोप करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तेजस्वी यांनी नितीश यांच्यावर 32 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोपसुद्धा यात केला आहे.
नेमके काय आहे व्हिडियोमध्ये ?
>@girirajsinghbjp हँडलवर शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये तेजस्वी महणत आहेत, ''ते (नितीश) म्हणत आहेत की आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू केले आहे. 50 हजारांपेक्षा अधिक लोकांना कारागृहता पाठवले आहे. पण, ज्यांना जेलच्या आत असावे लागत होते ते बाहेर आहेत. हे तर सोडाच. पण, नितीश काका विसरले की आपल्यावरही खुनाचा गुन्हा दाखल आहे. तेव्हाच न्याय होईल जेव्हा नितीशकुमार आपल्यावरी खटल्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवतील आणि स्वत:ला शिक्षा देतील. त्यांनी 32 हजार कोटींचा घोटाळाही केला आहे. ''