आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 दिवस फ्लॅटमध्ये बांधून ठेवले तरुणीला, बेशुद्ध करून आरोपी रोज करायचा रेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर - येथील हनुमाननगरमधील भगवती अपार्टमेंटमध्ये 12वीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या गँगरेपप्रकरणी खळबळजनक खुलासा झाला आहे. पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, पाच दिवसांपासून मनीष राजने तिला बांधून ठेवलेले होते. बेशुद्ध करून दररोज तिच्यावर रेप करत होता.

 

ट्यूशनहून परत येताना बळजबरी बसवले होते गाडीमध्ये
- तरुणीने सांगितले की, 15 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 5 वाजता ती इंग्रजीच्या ट्यूशनहून आपल्या रूमकडे परतत होती. तेव्हा वाटेत मनीषने तिला बळजबरी गाडीवर बसवले. ओरडू नये म्हणून तोंडही दाबले आणि तिला बेशुद्ध केले. 15 नोव्हेंबरच्या रात्री साडेदहा वाजता तिला शुद्ध आली तेव्हा तिला ती मनीषच्या फ्लॅटमध्ये असल्याचे आढळले. शुद्ध आल्यावर ती ओरडू लागली तेव्हा त्याने तिला दुसऱ्या रूममध्ये कोंडले. मोबाइलमधील सिमही तोडून टाकले.


तरुणीला 3 मित्रांसह मनीष न्यायचा परीक्षेसाठी
- तरुणीने सांगितले, 2-3 मुलांसह मनीष तिला परीक्ष द्यायला न्यायचा. परीक्ष संपल्यावर तिला फ्लॅटवर घेऊन यायचा. तो तिला भीती घालत होता. 19 नोव्हेंबरच्या रात्री 9 ते 10 वाजेदरम्यान मनीषने तरुणीला बळजबरी दारू पाजली. यानंतर मनीषच्या आतेभावाने सनीने नशेत तिच्यावर रेप केला.

 

बलात्काराचे पुरावे मिटवले, तरुणीचे कपडे फ्लॅटमध्ये लपवले
- तरुणीने सांगितले की, फ्लॅटमधून सनी गेल्यानंतर मनीषने तिच्यावर रेप केला. विरोध केल्यावर मनीषने नखांनी आणि चाकूने तिच्या शरीरावर अनेक जागी ओरखडे घेतले. तिचे कपडे मनीषने कुठेतरी लपवले होते. मनीष नशेत तर्रर्र होता, तो तिथेच पडला. यादरम्यान ती जीव वाचवून फ्लॅटमधून उतरून खाली आली. तेव्हा लोकांनी तिची मदत केली.

 

वडील म्हणाले- माझ्या मुलीची जिंदगी बरबाद करणाऱ्याला फाशी द्या!

- पीडिता म्हणाली की, 2016 मध्ये तिने मॅट्रिकची परीक्षा पास केली होती. सध्या एका ओपन युनिव्हर्सिटीच्या सेंटरमधून 12 वीचे शिक्षण घेत आहे. मागच्या 9 महिन्यांपासून एस.एम. कॉलेज रोडवर एका होस्टेलमध्ये राहून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजीचे ट्यूशन शिकत आहे. दुसरीकडे, पीडितेचे वडील म्हणाले की, त्यांच्या मुलीचे जीवन बरबाद करणाऱ्या दोन्ही नराधमांना पोलिसांनी अजूनही अटक करू शकलेले नाहीत. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तेव्हाच माझा राग शांत होईल.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...