आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Assualt Case She Jump From Hill News In Marathi

मित्राने केला बलात्कार, गॅंगरेप रोखण्यासाठी 80 फुटांवरुन पीडित तरुणीने मारली उडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची (झारखंड)- हजारीबागमध्ये एका तरुणीवर तिच्या मित्रानेच बलात्कार केला. त्यानंतर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापासून वाचण्यासाठी तरुणीने तब्बल 80 फुट उंच ठिकाणाहून उडी मारली. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
प्रमुख आरोपी नवाब याने हजारीबाग येथील कनहरी हिल्सवर सायंकाळच्या सुमारास मैत्रिणीवर बलात्कार केला. यावेळी दोन तरुण तेथे आले. त्यांना बघून नवाब पळून गेला. त्यानंतर त्या दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित तरुणीने 80 फुट उंच ठिकाणाहून दरीत उडी मारली. तिला हजारीबाग सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यानंतर तिला रांची येथील रिम्स येथे हलविण्यात आले आहे.
तरुणीने पोलिसांना दिलेले खळबळजनक बयान वाचा, पुढील स्लाईडवर