आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहिणीचा दीर न्यायचा मुलांच्या होस्टेलमध्ये, तेथे तरुणीसोबत करायचा असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धौलपूर - एका तरुणीने धौलपूरच्या रहिवासी प्रायव्हेट डॉक्टरवर लग्नाचे आमिष दाखवून 11 वर्षांपासून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तरुणी गर्भवती झाल्यावर डॉक्टरने तिला औषध देऊन गर्भपातही केला. पीडितेचे म्हणणे आहे की, डॉक्टरने तिला म्हटले होते की, भावाचे लग्न झाल्यावर तुझ्याशी लग्न करेन. यानंतर भावाचे लग्न झाले, परंतु त्याने आता लग्नाला नकार दिला आहे. यासंबंधी तरुणीने तक्रारअर्जाद्वारे आरोपी डॉक्टर आणि तिच्याविरुद्ध प्रकरणाची नोंद केली आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- पोलिसांनी प्रकरण नोंदवून तरुणीचे मेडिकल केले. पीडिता म्हणाली की, धौलपूरच्या एका प्रायव्हेट डॉक्टर तिच्या बहिणीचा दीर आहे. 2006 मध्ये दिवाळीच्या सुट्या साजऱ्या करण्यासाठी ती बहिणीच्या घरी गेली होती. एका दिवशी तिला घरात एकटी पाहून आरोपीने तिला आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला.
- यानंतर पीडिता घटनेची माहिती घरातील सर्वांना सांगणार असल्याचे म्हणाली तेव्हा आरोपीने तिला धमकी दिली तसेच लग्न करण्याचे आश्वासन दिले.
- यानंतर प्रायव्हेट डॉक्टरने लग्नाचे आमिष देऊन सातत्याने शारीरिक आणि मानसिक शोषण केले. तरुणी म्हणाली की, आरोपीने आग्राच्या एका कॉलेजमधून एमबीबीएस केले आहे. आरोपीने तिला अनेक वेळा कॉलेजमधील मुलांच्या होस्टेलमध्ये नेले. तेथे आरोपीने होस्टेलमध्येही दुष्कर्म केले. महिला पोलिस स्टेशनच्या एसएचओ म्हणाल्या की, प्रकरणाची नोंद केली असून पीडितेचे मेडिकल करण्यात आले आहे.

 

गर्भवती झाल्यावर केले आहेत गर्भपात
- तरुणीच्या मते ती गर्भवती झाल्याची चाहूल लागताच तिने डॉक्टरला याबाबत सांगितले. तो तिला सोनोग्राफी सेंटरवर घेऊन गेला. रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्याने बळजबरी गोळ्या खाऊ घालून गर्भपात केला. तरुणीला डॉक्टर तिच्या अब्रूशी खेळत असल्याची जाणीव होताच तिने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. यानंतर पीडितेने मोठ्या भावासह पोलिस स्टेशन गाठून याची तक्रार दाखल केली आहे.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...