आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छेडछाड : अश्लिल वक्तव्यानंतर तरुणीने रोड रोमियोला दिला काठीचा प्रसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हांसी । बाईकवरून आलेल्या एका युवकाने रस्त्यावरून जाताना तरुणीची छेडछाड करताच या तरुणीने रोड रोमियोला रस्त्यातच काठीने बदडून काढले. सुरुवातीला तरुणीला एकटी असल्याचे पाहून छेडछाड करणा-या या तरुणाने तिने दुर्गेचे रूप धारण करताच माफी मागायला सुरुवात केली आणि पळ काढला. मात्र, तरुणीने त्याला पळू दिले नाही, आणि त्याला चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर लोक जमा झाल्यानंतर त्या तरुणीने त्याला सोडले.

एखाद्या व्हिलनप्रमाणे हा युवक बाईकवरून आला होता. त्याने तरुणीबाबत अश्लिल वक्तव्य केले. पण तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर त्याने थोडी पुढे बाईक उभी केली आणि त्या तरुणीजवळ पोहोचला. त्यानंतर त्याने तरुणीचा हात पकडण्याचा प्रयत्न करताच, त्या तरुणीने त्याला एक थापड ठेऊन दिली. त्यानंतर त्याने आणखी त्रास द्यायला सुरुवात केली. त्यावेळी आजुबाजुच्या काही लोकांनी हा प्रकार पाहिला. पण ते तरुणीच्या मदतीला धावण्याआधीच तरुणीने शेजारच्या एखा दुकानावरून एक काठी घेतली आणि त्याला झोडपण्यास सुरुवात केली. काठीचे फटके सुरू होतात, व्हीलन बनलेला हा तरुण हातापाया पडायला लागला.

पुढील स्लाईडवर पाहा PHOTOS