हांसी (हरियाणा) - एका दुचाकीस्वाराला रस्त्यावरून जाणार्या युवतीची छेड काढणे चांगलेच महागात पडले. युवकाच्या छेडछाडीमुळे त्रस्त झालेल्या या युवतीने कोणालाही मदतीसाठी बोलावले नाही, तर स्वत:च त्याला काठीने बडवून ‘ऑन द स्पॉट’ शिक्षा दिली. आधी हा युवक अबला समजून जिची छेड काढत होता, त्या युवतीने आक्रमक स्वरूप धारण करताच त्याने माफी मागण्यास सुरुवात केली. पळून जाण्याचा प्रयत्नही केला, पण लाठीधारी युवतीने त्याला तशी संधीच दिली नाही आणि चांगलीच ‘धुलाई’ केली. लोकांची गर्दी झाल्याने युवतीने युवकाला सोडून दिले आणि पोलिसांत कुठलीही तक्रार नोंदवली नाही.