आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Beat Up Eve Teaser In Police Station Police Makes Video

संतप्त युवतीने पोलिस ठाण्यात रोडरोमिओला चपलेने शेकले, VIDEO व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीलीभीत- उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यात एका रोडरोमिओची पोलिस ठाण्यात इथेच्छ धुलाई झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रोडरोमिओची धुलाई पोलिसांनी नव्हे तर एका युवतीने केली आहे, ते ही पोलिसांसमोर. विशेष म्हणजे युवती रोडरोमिओला लाथाबुक्क्यांनी मारत होती आणि पोलिस आपल्या मोबाइलमध्ये व्हिडिओ बनवण्यात मशगूल होते. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

असे आहे प्रकरण...
पीलीभीत येथील इंटर कॉलेजसमोर आरोपी अंकित दररोज उभा राहून येणार्‍या-जाणार्‍या मुलींची छेड काढत होता. मुलींवर अश्लील कमेंट करत होता. यामुळे संजनासह अनेक मुली खूप त्रस्त झाल्या होत्या.

अंकितने शनिवारी नेहमीप्रमाणे संजनाची छेड काढली. त्यावर संजनाने त्याची बाइक रोखून चावी काढून घेतली. संजनाने आरोपी अंकित पकडले आणि पोलिस ठाण्यात ओढत नेऊन पोलिसांच्या हवाले केले. अंकितच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडीलांना मुलाचे 'प्रताप' सांगितला. सजंना पुन्हा पोलिस ठाण्यात आली. पोलिसांसमोर अंकितला पुन्हा बेदम मारहाण केली. आरोपीने नंतर संजनाचे पाय धरून तिची सगळ्यांसमोर माफी मागितली.

एसपी म्हणाले चौकशी होईल...
आरोपी अंकितला संजना चपलेने शेकत होती, तेव्हा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. इतकेच नव्हे तर ठाण्याचे प्रभारी आपल्या मोबाइलमध्ये घटनेचा व्हिडिओ बनवण्यात मशगूल होते. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एसपी जे.के.शाही यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. ठाण्याचे प्रभारी चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्‍यात येईल, शाही यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, रोडरोमिओची इथेच्छ धुलाई करतानाचे युवतीचे फोटो...