आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सॅंडलने उतरवली मजनूगिरी, युवतीने तिघांना झोडपले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- पलामू जिल्ह्यातील विश्रामपूरमध्ये युवकांच्या छेडछाडीला कंटाळलेल्या एका युवतीने तब्बल तीन युवकांना सॅंडलचा यथेच्छ प्रसाद दिला. गेल्या तीन महिन्यांपासून कॉलेजला जाताना हे युवक तिला छेडत होते. अश्लील भाषेचा वापर करून तिला त्रास देत होते. याची युवतीने आपल्या आई-वडिलांना माहिती दिली होती. त्यानंतर युवतीच्या आई-वडिलांनी युवकांच्या आई-वडिलांकडे तक्रार केली होती. परंतु, त्याचा काही परिणाम झाला नाही. शेवटी त्रासाला कंटाळून युवतीने तिन्ही युवकांची यथेच्छ धुलाई केली. त्यानंतर जमलेल्या जमावानेही युवतीला मदत करीत युवकांना चांगली अद्दल घडविली.