आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Become Doctor Who Is Daughter Of As Sex Worker In Rajasthan

\'सेक्स वर्कर\'ची मुलगी बनली डॉक्टर, मुलीच्या सन्मानार्थ आईने सोडला \'गंदा धंधा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलवर- तिला बदल हवा होता. देहविक्रीच्या दलदलीतून बाहेर निघून तिला सन्मानाने जीवन जगायचे होते आणि तिने तसेच केलेच. स्वत:च मार्ग बदलला. देहविक्रीचा 'गंदा धंदा' सोडून शिलाई काम सुरु केले आणि आपल्या मुलीला डॉक्टर बनवले. इतकेच नव्हे तर अापल्या दोन सहकारी महिलांच्या आयुष्यातही आशेचा किरण प्रज्वलित केला.

राजस्थानमधील अलवर येथील गाजूकी वस्तीतील तीन सेक्स वर्कर्सनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. देहविक्री करत असलेल्या या तीन महिलांनी आपल्या चार मुलींना आपल्यापासून लांब ठेवले. त्यांना शिकवले. उच्च शिक्षण दिले. आता चार पैकी दोन डॉक्टर बनल्या आहेत तर दोन इंजीनिअरींगचे शिक्षण घेत आहेत. तिन्ही महिलांच्या मुली समाजात परिवर्तन घडून आणण्यासाठी प्रेरक ठरल्या आहेत. आता या महिलांना मागे वळून पाहायचे नाही. मात्र, मुलींना सम्मानाचे आयुष्य देण्यासाठी तब्बल तीन वर्षे करावा लागलेला संघर्ष त्यांना विसरायचा नाही आहे.
अलवरमधील या मातांनी देहविक्रीच्या दलदलीत राहून आपल्या मुलींना इतकी सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे की, आता त्यांना संघर्ष करण्याचीही गरज नाही. मुलींनीही उच्चशिक्षण घेऊन आपल्या मातांच्या संघर्षाला न्याय मिळवून दिला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक वाचा, मुलीच्या सन्मानार्थ आईने सोडला 'गंदा धंदा'